Hero Super Splendor : Hero कंपनीचे लोकप्रिय Super Splendor नवे एडीशन लाँच, किंमत आणि मायलेज जाणून घ्या
Hero Moto Corp : देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने त्यांच्या लोकप्रिय बाईक सुपर स्प्लेंडरचे एक नवीन एडीशन लॉंच केले आहे.
Hero Super Splendor : देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने त्यांच्या लोकप्रिय 125cc कॉम्युटर बाईक सुपर स्प्लेंडर (Super Splendor) चे एक नवीन एडीशन लॉंच केले आहे. कंपनीने नवीन बाईक (2022 Hero Super Splendor Canvas Black Edition) 77,430 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह लॉंच केली आहे. यात अनेक नवीन फीचर्स मिळतात आणि कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 60 ते 68 किमी प्रति सेगमेंटचे सर्वोत्तम मायलेज देते.
डिझाइनच्या बाबतीत
ही मोटरसायकल तिच्या इतर एडीशन प्रमाणेच आहे. मात्र, हे विशेष कॅनव्हास ब्लॅक एडीशन सादर करण्यात आले आहे. यासोबतच सुपर स्प्लेंडर आणि एच-लोगोचे थ्रीडी ब्रँडिंग देण्यात आले आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, नवीन सुपर स्प्लेंडर कॅनव्हास ब्लॅक एडिशनला डिजिटल-एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि USB चार्जर मिळतो.
इंजिन पॉवर आणि मायलेज
सुपर स्प्लेंडर कॅनव्हास ब्लॅक हे 125cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, FI इंजिन आहे, जे नियमित व्हेरियंटवर उपलब्ध आहे. हे इंजिन 7,500 rpm वर 10.7 bhp आणि 6,000 rpm वर 10.6 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, तिची इंधन कार्यक्षमता 13 टक्क्यांनी वाढली आहे आणि ते 60-68 किमी प्रति सेगमेंटचे सर्वोत्तम मायलेज देते.
Hero MotoCorp च्या स्ट्रॅटेजी आणि ग्लोबल प्रॉडक्ट प्लॅनिंगचे प्रमुख मालो ले मेसन म्हणाले, “स्प्लेंडर फॅमिली देशातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह मोटरसायकल ब्रँडपैकी एक आहे. कॅनव्हास ब्लॅक एडिशन सुपर स्प्लेंडरच्या प्रीमियम ऑफरमध्ये वाढ करण्यासाठी डिझाइन केले आहे. ही बाईकमध्ये एक स्टाइलिश आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत मॉडेल, आधुनिक डिझाइन दिसते. Hero MotoCorp चीफ डेव्हलपमेंट ऑफिसर (CGO) रणजीवजीत सिंग म्हणाले, “कॅनव्हास ब्लॅक एडिशनमधील सर्व-नवीन हीरो सुपर स्प्लेंडर कामगिरी आणि लक्झरी फिचर्स देऊन ग्राहकांच्या आकांक्षांना नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे पुन्हा एकदा तंत्रज्ञान आणि स्टाईलमध्ये नवीन बेंचमार्क सेट केला आहे.