एक्स्प्लोर

Volkswagen Virtus Sedan भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Volkswagen Virtus: जर्मनीतील आघाडीची वाहन निर्माता कंपनी Volkswagen (Folkswagen) ने आपली नवीन मध्यम आकाराची सेडान Volkswagen Virtus भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे.

Volkswagen Virtus: जर्मनीतील आघाडीची वाहन निर्माता कंपनी Volkswagen (Folkswagen) ने आपली नवीन मध्यम आकाराची सेडान Volkswagen Virtus भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने या कारची प्रारंभिक किंमत 11.22 लाख रुपये इतकी ठेवली आहे. भारतातील कारप्रेमी या सेडान कारची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते.

बुकिंग सुरू 

मार्च 2022 मध्ये ही सेडान भारतात अधिकृतपणे सादर करण्यात आली होती. Volkswagen Virtus sedan खरेदी करू इच्छिणारे ग्राहक 11,000 रुपयांची टोकन रक्कम भरून ऑनलाइन किंवा अधिकृत Volkswagen डीलरशिपवर ही कार बुक करू शकतात.

Volkswagen Virtus कार डीलरशिपवर उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. या कारची ग्राहक टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकतात. इंडिया 2.0 प्रकल्पाअंतर्गत हे ब्रँडचे दुसरे मॉडेल आहे. नवीन सेडान फोक्सवॅगन ग्रुपच्या MQB AO IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. जे VW Taigun, koda Kushak आणि Slavia मध्ये देखील वापरण्यात आले आहे.

सेडानबरोबरच एसयूव्हीही स्पर्धा करेल

नवीन Virtus ने भारतीय बाजारपेठेत Volkswagen Vento (Folkswagen Vento) ची जागा घेतली आहे. हे कंपनीचे महत्त्वाकांक्षी मॉडेल आहे, जे Honda City, Maruti Suzuki Ciaz आणि Hyundai Verna सारख्या देशातील आघाडीच्या सेडान कारला आवाहन देऊ शकते. तसेच ही कार मध्यम आकाराच्या SUV लाही टक्कर देईल.

इंजिन आणि पॉवर 

Volkswagen Virtus दोन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. यात ACT सह 1.5-लीटर TSI EVO इंजिन आणि 1.0-लिटर TSI इंजिन मिळेल. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर आणि 7-स्पीड DSG समाविष्ट आहे. परफॉर्मन्स लाइन व्हेरियंट 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करतो. तर डायनॅमिक लाइन व्हेरिएंट 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करेल.

फीचर्स 

या सेडान कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. स्टाइलिंग आणि फीचर्सच्या बाबतीत ही कार प्रीमियम फील देते. डॅशबोर्डला 20.32 सेमी डिजिटल कॉकपिट, एक मोठा 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील यात ग्राहकांना मिळतो. ड्युअल-टोन इंटीरियर थीमसह लाल अॅक्सेंट दिले गेले आहेत, जे त्याच्या स्पोर्टी लुकमध्ये भर घालतात. यात अनेक कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि केबिनमध्ये आठ-स्पीकर ऑडिओ सिस्टम देण्यात आला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
मोठी बातमी : भाजपनं पुरतं घेरलं, शिंदेसेनेचे रवींद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; बायको, मुलाला उमेदवारी नाकारल्याने वेगळा पर्याय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2025 | सोमवार
Nashik Municipal Corporation: नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
नाशिकमध्ये महायुतीला सुरुंग लागलाच! भाजपविरोधात शिंदेगट-अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शड्डू
BMC Election : राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देताना हसून म्हणाले...
Embed widget