TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
TVS Apache RTR 160 4V Special Edition : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS मोटर आपली लोकप्रिय Apache चा सेप्शल एडिशन लॉन्च केला आहे.
TVS Apache RTR 160 4V Special Edition : प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS मोटर आपली लोकप्रिय Apache चा सेप्शल एडिशन लॉन्च केला आहे. या स्पेशल एडिशनचे नाव 2023 TVS Apache RTR 160 4V आहे. पर्ल व्हाइट कलरमधील या स्पेशल एडिशनची किंमत 1,30,090 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ग्राहक ही बाईक भारतातील TVS मोटर कंपनीच्या डीलरशिपवरून खरेदी करू शकता. या बाईकमध्ये कंपनीने अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत. याचा लूकही जबरदस्त आहे. या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
Apache सिरीज TVS रेसिंग ही "ट्रॅक टू रोड" वर आधारित असल्यामुळे या बाईकची कार्यक्षमता, तंत्रज्ञान आणि वेगळी शैली प्रतिबिंबित करते. हे लक्षात घेऊन हा नवीन स्पेशल एडिशन व्हेरिएंट नवीन पर्ल व्हाइट कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हे आधीपासून बाजारात उपलब्ध असलेल्या मॅट ब्लॅक स्पेशल एडिशनमध्ये सामील होते. स्पेशल एडिशन व्हेरियंटमध्ये पूर्णपणे लाइटवेट बुलपअप मफलर्स मिळतील, जे सिग्नेचर RTR एक्झॉस्ट नोट वाढवतील. तसेच यामुळे बाईकचे वजन 1 किलोने कमी झाले आहे, ज्यामुळे पॉवर टू वेट रेशो वाढते आणि पॉवर डिलिव्हरी प्रचंड वाढते.
इंजिन
2023 TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशनमध्ये 159.7 cc, ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 9250 rpm पॉवर आउटपुटवर 17.55 PS आणि 7250 rpm वर 14.73 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करते. हे एका आकर्षक 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ड्युअल टोन सीट नवीन पॅटर्नसह येते. तसेच अॅडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लीव्हर, तीन अर्बन, स्पोर्ट आणि रेन रायडिंग मोड उपलब्ध आहेत.
याशिवाय, TVS SmartX कनेक्टिव्हिटी आणि TM रियर रेडियल टायर, गीअर शिफ्ट इंडिकेटर सिग्नेचर डेटाइम रनिंग लाईट (DRL) असलेले ऑल-एलईडी हेडलॅम्प उपलब्ध आहेत. लॉन्च प्रसंगी बोलताना TVS मोटर कंपनीचे बिझनेस-प्रिमियम हेड विमल सुंबली म्हणाले, “TVS Apache RTR बाईक आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहक केंद्रीत नेहमीच आघाडीवर राहिली आहे. चार दशकांच्या रेसिंग बाईक्ससह नवीन 2023 TVS Apache RTR 160 4V स्पेशल एडिशन सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: