Upcoming Electric Cars: भारतात लवकरच लॉन्च होणार 'या' तीन नवीन इलेक्ट्रिक कार
Electric Cars: भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
Electric Cars: भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. यातच टाटा भारतीय बाजारपेठेत सर्वोत्कृष्ट ईव्ही पैकी एक ऑफर करत असताना, इतर प्रतिस्पर्धी देखील या वर्षी त्यांच्या स्वत: च्या नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा विचार करत आहेत. लाँच होणारी पहिली कार म्हणजे Kia ची इलेक्ट्रिक कार. भारतातील पहिल्या Kia इलेक्ट्रिक कारसाठी बुकिंग या महिन्यात सुरू होणार आहे. तर अंदाज वर्तवला जात आहे की, ही कार पुढील महिन्यापर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. तुम्हालाही नवीन EV खरेदी करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा, यात आम्ही तुम्हाला आगामी तीन इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती सांगणार आहोत.
Hyundai Ioniq 5
अलीकडेच Hyundai Motor India ने 2022 च्या अखेरीस भारतात Ioniq 5 इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. Ioniq 5 इलेक्ट्रिक कार ही भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीची दुसरी EV असेल. याशिवाय, Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक कार 2022 च्या वर्ल्ड कार ऑफ द इयर ची विजेती आहे. या कारमध्ये दोन भिन्न बॅटरी पॅक, 58kWh बॅटरी पॅक आणि 72.6kWh बॅटरी पॅकच्या पर्यायासह येते. कंपनीने एका चार्जवर 481 किमी पेक्षा जास्त रेंज देण्याचा दावा केला आहे.
Kia EV6
दक्षिण कोरियाची ऑटोमेकर Kia आता Kia EV6 इलेक्ट्रिक क्रॉसओवर भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Kia Carens नंतर आता कंपनी आपल्या EVs द्वारे भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याचा विचार करत आहे. Kia ने अलीकडेच EV6 साठी एक टीझर जारी केला आहे, ज्यामध्ये कारचा जबरदस्त लुक दिसत आहे. जो किआच्या इतर वाहनांसारखा दिसतो. मात्र, कंपनीने या वाहनाशी संबंधित अन्य माहिती दिलेली नाही. याची बुकिंग 26 मे पासून सुरू होईल आणि कंपनी पुढील महिन्यात ही कर लॉन्च करू शकते.
Tata Altroz EV
टाटा ने अलीकडेच Tata Nexon ला मोठ्या बॅटरी पॅकसह अपडेट केले आणि Tata Nexon Max भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. आता कंपनी Altroz EV लाँच करण्याच्या तयारीत आहे.