![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
टाटाला मिळाली मोठी ऑर्डर, 'या' राज्यासाठी बनवणार 1,500 इलेक्ट्रिक बस
Tata Electric Bus: वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारही आता इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहे. यासाठी अनेक राज्यांची सरकारे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेल बसेसऐवजी इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करत आहेत.
![टाटाला मिळाली मोठी ऑर्डर, 'या' राज्यासाठी बनवणार 1,500 इलेक्ट्रिक बस Tata got a big order, will make 1,500 electric buses for the state टाटाला मिळाली मोठी ऑर्डर, 'या' राज्यासाठी बनवणार 1,500 इलेक्ट्रिक बस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/7ed853f2dff70adbccab29db2e3d6e411658676556_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tata Electric Bus: वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारही आता इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहे. यासाठी अनेक राज्यांची सरकारे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेल बसेसऐवजी इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करत आहेत. डिझेलवर चालणाऱ्या बसेस पूर्णपणे बदलून त्याऐवजी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची सरकारची योजना आहे. आता दिल्ली परिवहन महामंडळाने (DTC) टाटा मोटर्सला 1,500 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे.
याबाबत महिती देताना दिल्ली परिवहन महामंडळचे एमडी नीरज सेमवाल म्हणाले की, “आम्हाला टाटा मोटर्सला 1500 इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डरची पुष्टी करताना आनंद होत आहे. इको-फ्रेंडली बसेसच्या समावेशामुळे वायू प्रदूषण कमी होईल. दिल्लीच्या लाखो नागरिकांना याचा फायदा होईल. DTC प्रवाशांच्या आणि समाजाच्या फायद्यासाठी नवीन तंत्रज्ञान सादर करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत."
टाटा मोटर्सने शुक्रवारी एका निवेदनात सांगितले की, कंपनी 12 वर्षांच्या कालावधीसाठी वातानुकूलित, 'लो फ्लोअर' इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा, संचालन आणि देखभाल यासाठी जबाबदार असेल. टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष रोहित श्रीवास्तव म्हटले आहे की, “या बसेसच्या वितरणामुळे DTC सोबतची आमची भागीदारी आणखी मजबूत होईल. तसेच दिल्ली शहरातील लोकांसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेसाठी मदत होणार आहे. आम्ही भारतातील सार्वजनिक वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहोत." दरम्यान, टाटा समूहाच्या कंपनीने यापूर्वीच देशातील विविध शहरांमध्ये 650 हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Car : कुटुंबाच्या सुरक्षेसाठी 'या' आहेत भारतातील 11 सर्वात सुरक्षित कार; ही आहे संपू्र्ण लिस्ट
- Hyundai Discount Offers : Hyundai ची मान्सून ऑफर; 'या' गाड्यांवर तब्बल 50 हजारांची सूट
- Scorpio N Delivery : ठरलं! 'या' दिवसापासून बहुप्रतिक्षित महिंद्रा Scorpio N ची डिलिव्हरी सुरु होणार
- Hyundai Electric Cars : Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक कारची पहिली झलक; लवकरच भारतात होणार लॉन्च
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)