(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tata Avinya Electric SUV : टाटा मोटर्सच्या नव्या ईव्ही एसयूव्हीची झलक, एका चार्जमध्ये गाठणार 500 किमीहून अधिक अंतर, पाहा भन्नाट लूक
Tata Avinya Electric SUV : देशातील आघाडीची वाहन निर्माती कंपनीने टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या 'टाटा अविन्या' (Tata Avinya) या नव्या एसयूव्हीची झलक दाखवली आहे.
Tata Avinya Electric SUV : देशातील आघाडीची वाहन निर्माती कंपनीने टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या 'टाटा अविन्या' (Tata Avinya) या नव्या एसयूव्हीची पहिली झलक भारतात लाँच केली आहे. ही कार टाटा मोटर्सच्या तिसऱ्या पिढीतील आर्किटेक्चर 'बॉर्न इलेक्ट्रिक'वर आधारीत पहिलं मॉडेल आहे. हे मॉडेल अनेक प्रकारच्या कारच्या बॉडी स्टाइलला सपोर्ट करते. टाटा मोटर्सनं सांगितलं आहे की ही कार ADAS सारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये सह येईल. नवीन आर्किटेक्चरमुळे या कारला केबिनसाठी अधिक जागा मिळणार आहे.
मिळालेल्या रिपोर्टनुसार असा दावा करण्यात येत आहे की, 'टाटा अविन्या' या नव्या एसयूव्हीची संकल्पना भारतात लाँच करण्यात आली आहे. खास भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन 'टाटा अविन्या' डिझाईन करण्यात आली आहे. मात्र, ही कार जागतिक बाजारातही विकली जाईल, असे टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितलं आहे.
'अविन्या'चा अर्थ काय?
टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी या कॉन्सेप्ट कारच्या नावाबद्दल सांगितले की, 'अविन्या' हा संस्कृत भाषेतून आलेला शब्द असून त्याचा अर्थ नावीन्य असा होतो. तसेच या नावात IN देखील येतो. जी भारताची ओळख आहे. चंद्रा यांनी सांगितले की, भविष्यातील गरजा लक्षात घेत अविन्याची निर्मिती झाली आहे.
भविष्याला अनुसरीत डिझाइन
टाटा अविन्याचे डिझाईन भविष्याला अनुसरुन बनवण्यात आलं आहे. हे डिझाइन साधे आणि सोपे ठेवण्यात आले आहे. कारच्या स्टीयरिंग व्हीलवर टच पॅनेल देण्यात आले आहे आणि यावरून कारची सर्व वैशिष्ट्ये नियंत्रित केली जातील. कारचा डॅशबोर्ड प्रत्यक्षात एक संपूर्ण साउंड बार आहे. प्रत्येक प्रवाशाच्या हेडरेस्टवर स्पीकर देण्यात आले आहेत, जेणेकरून गाणी ऐकताना सुंदर वैयक्तिक अनुभव घेता येईल.
पाहा नव्या टाटा अविन्याचा भन्नाट लूक, अधिक फोटोसाठी येथे क्लिक करा
2025 मध्ये बाजारात दाखल होणार
टाटा मोटर्सने सांगितले की, ही कार कंपनीच्या Gen 3 आर्किटेक्चरवर आधारित इलेक्ट्रिक कार आहे. ही कार नव्या युगातील तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज आहे. कंपनीने सांगितले की टाटा अविन्या ईव्ही 2025 पर्यंत बाजारात दाखल होईल.
कारचा डॅशबोर्ड आकर्षक
कारच्या आतही भरपूर जागा आहे. ड्रायव्हरची 360 डिग्री गोल फिरू शकते. कारचा डॅशबोर्ड (Tata AVINYA) देखील खूपच आकर्षक दिसत आहे. आगामी काळात ग्राहकांच्या गरजा आणि आकांक्षा लक्षात घेऊन या कारची रचना करण्यात आल्याचा कंपनीनं म्हटलं आहे. टाटा मोटर्स येत्या काही वर्षांत अनेक इलेक्ट्रिक कार घेऊन बाजारात धमाका करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनी सातत्याने काम करत आहे.
लाइट सिग्नेचर आणि डीआरएलमुळे आधुनिक लुक
कारच्या आतमध्ये पुरेसा नैसर्गिक प्रकाश असेल अशा पद्धतीने कारची रचना करण्यात आली आहे. कारमध्ये मोठे सनरूफ आहे. कारच्या पुढील बाजूस असलेले लाइट सिग्नेचर आणि DRLs समोरचा लूक आणखी आकर्षक बनवतात.
महत्त्वाच्या बातम्या :
- Tata Curvv EV : टाटाची नवी Curvv EV, सिंगल चार्जमध्ये गाठणार 500 किमी अंतर, भारतात केव्हा होणार लाँच?
- Camry Hybrid Review: लहान हॅचबॅक कार इतकेच मायलेज देणारी लग्झरी कार! दमदार इंजिनसह किंमत आहे...
- GAGAN : स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीम 'गगन' वापर यशस्वी, 'इंडिगो' ठरली लॅंडिंग करणारी पहिली एअरलाइन
- Nandan Nilekani : अमेरिकन कंपन्यांविरोधात सरकारची मोहीम, अॅमेझॉन आणि वॉलमार्टपासून भारतीय दुकानदारांना वाचवणार नंदन निलेकणी