(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Camry Hybrid Review: लहान हॅचबॅक कार इतकेच मायलेज देणारी लग्झरी कार! दमदार इंजिनसह किंमत आहे...
Toyota Camry Hybrid 2022: तुम्ही जर एक मजबूत हायब्रीड कार खरेदी करण्याचा विचार करत असतात, तर कमी किंमतीत Camry Hybrid हा एकमेव पर्याय आहे.
Toyota Camry Hybrid 2022: तुम्ही जर एक मजबूत हायब्रीड कार खरेदी करण्याचा विचार करत असतात, तर कमी किंमतीत Camry Hybrid हा एकमेव पर्याय आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असले की, मजबूत हायब्रीड कार म्हणजे नेमकं काय? ही एक अशी कार आहे ज्यामध्ये पेट्रोल इंजिन, बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिक मोटर अशा तिन्ही सुविधा उपलब्ध आहे. ही कार फक्त इलेक्ट्रिक पॉवरवर, पेट्रोल/इलेक्ट्रिक पॉवरवर किंवा दोन्हीवर धावू शकते. प्लग-इन हायब्रिडच्या विपरीत बॅटरी पॅक इंजिन किंवा रीजनरेटिव्ह ब्रेकिंगद्वारे चार्ज केला जातो. त्यामुळे इलेक्ट्रिक कारप्रमाणे ही कार चार्ज करण्याची गरज नाही.
नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ही लग्झरी कार लहान हॅचबॅक प्रमाणेच मायलेज असलेली मोठी कार आहे. Camry Hybrid कार सुमारे 24 kmpl चा मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र आम्ही याची टेस्ट केली असता ही कार 15-16 kmpl मायलेज देत असल्याचं दिसून आलं आहे. जी एका मोठ्या सेडानमध्ये मिळणाऱ्या अनेक सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीपेक्षा चांगले आहे. तसेच EV मोडमध्ये तुम्ही या कारने एक लहान ट्रिप करू शकता. ट्रॅफिकमध्ये ही कार तुम्ही आरामात चालवू शकता. याचे इंजिन अधिक आवाज करत नाही. याचा फायदा असा की तुम्ही ही कार चालवत असताना कमी वेगातून अधिक वेगात या कारचे इंजिन कधी शिफ्ट होईल हे कळणार देखील नाही.
बॅटरी आणि इंजिन
या कारच्या बॅटरीची चार्जिंग उतरल्यास ती बर्यापैकी लवकर चार्ज होते. याचे पेट्रोल इंजिन देखील जास्त आवाज करत नाही. यात 178 Bhp पॉवर निर्माण करणारे 2.5-लिटर पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले आहे. याला CVT गिअरबॉक्स मिळतो, पण तोही कारशी सुसंगत आहे. ही कार तुम्ही फास्ट किंवा कमी गतीने पळवा, तुम्हाला ही कार चालवताना खूप स्मूथ फील होईल.
ही एक मोठी कार असूनही Camry Hybrid मध्ये लाइट स्टिअरिंग आहे, ज्यामुळे ही कार चालवणे सोपे होते. ही कार चांगल्या ग्राउंड क्लीयरन्ससह येते आणि मोठमोठ्या स्पीड ब्रेकरवरही कार घसरत नाही. लक्झरी कारसाठी सॉफ्ट सस्पेंशनसह राइड देखील उत्कृष्ट आहे. दरम्यान, जर तुम्हाला कॅमरी हायब्रीड वेगाने चालवायची असेल तर, याचे गिअरबॉक्स थोडे आवाज करणारे आहे.
यात मोठ्या सीट्स आहेत, ज्या उत्तम लेगरूमसह आरामदायी आहेत. ज्यामुळे ग्राहकांना यात सर्वगुण संपन्न लक्झरी सेडानचा अनुभव येतो. तुम्ही सीट रिक्लाईन करू शकता. अधिक जागेसाठी समोरील प्रवासी आसन देखील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पुढे सरकवले जाऊ शकते. एसी आणि ऑडिओसाठी पॉवर असिस्टेड रिअर सनशेड, रिअर टच कंट्रोल देखील आहे. ही कार एखाद्या महागडी लक्झरी कारसारखी दिसते. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह मोठी 9-इंच स्क्रीन, एक छान हेड-अप डिस्प्ले, सनरूफ, 10-वे पॉवर-अॅडजस्ट फ्रंट ड्रायव्हर सीट, वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स यात देण्यात आले आहे. यासह डॅशबोर्डमध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहे.
किंमत
यात 3-झोन क्लायमेट कंट्रोल, 9-स्पीकर JBL ऑडिओ सिस्टीम, मागील कॅमेरा आणि इतर सुरक्षा प्रणाली देखील ग्राहकांना मिळणार आहे. Camry Hybrid ची किंमत आता वाढवण्यात आली आहे, मात्र तरीही या किमतीत या कारचे कोणतेही प्रतिस्पर्धी नाहीत. बाजारात याची प्रारंभिक किंमत 43.4 लाख रुपये आहेत.