नवीन लूक आणि जबरदस्त फीचर्ससह रॉयल एनफिल्डची Scram 411 लॉन्च, डेली युजसाठी आहे परफेक्ट
Royal Enfield scram 411 India launch: देशातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्ड भारतात आपली ऑल न्यू Scram 411 बाईक लॉन्च केली आहे.
Royal Enfield scram 411 India launch: देशातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्ड भारतात आपली ऑल न्यू Scram 411 बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक म्हणजे हिमालयन बाईकचीच लहान बहीण, असं ही आपण याला म्हणू शकतो. ही बाईक हिमालयन बाईकवरच आधारित आहे. असं असलं तरी Himalayan ही एक प्रॉपर ऍडव्हेंचर बाईक आहे, तर Scram 411 ही डेली युजसाठी परफेक्ट अशी बाईक आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
मिळणार सात रंग पर्याय
Royal Enfield ने ही बाईक एकूण सात रंगांमध्ये सादर केली आहे. यात व्हाईट फ्लेम, सिल्व्हर स्पिरिट, ब्लेझिंग ब्लॅक, स्कायलाइन ब्लू, ग्रेफाइट रेड, ग्रेफाइट ब्लू आणि ग्रेफाइट यलो रंगाचा समावेश आहेत. डिझाइनच्या बाबतीत Scrum 411 मध्ये काही व्हिज्युअल बदल पाहायला मिळतात, जे या बाईकला हिमालयापासून वेगळे करतात. उदाहरणार्थ, हिमालयात उंच विंडस्क्रीन मिळतो, तर Scram 411 हे मिळत नाही.
याशिवाय यात सिंगल-पीस सीट, हेडलॅम्पभोवती कास्ट मेटल काउल, ऑफसेट स्पीडो मीटर, अॅल्युमिनियम संप गार्ड देण्यात आला आहे RE ने इंधन टाकीच्या चारीबाजूस प्लास्टिकच्या बिट्सचीही पुनर्रचना केली असून यात आता एक नवीन ग्रेल मिळेल. कंपनी आपल्या 'MiY' (मेक इट युवर) कस्टमायझेशन प्रोग्रामचा एक भाग म्हणून ट्रिपर नेव्हिगेशन पॉडसह अनेक अॅक्सेसरीज देखील या बाईकवर ऑफर करत आहे.
इंजिन आणि किंमत
नवीन Scrum 411 मध्ये 411cc सिंगल-सिलेंडर, SOHC, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. जे RE हिमालयालामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. हे इंजिन 24.3 hp पॉवर आणि 32 Nm टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाले तर, यात ड्युअल-चॅनल ABS फ्रंट 310 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 240 mm डिस्क युनिट मिळेल. कंपनीने भारतीय बाजारात याची एक्स-शोरूम किंमत 2.03 लाख रुपये ठेवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Maruti Suzuki Car Discount: मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळत आहे जबरदस्त सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर
- Electric Vehicle Policy : मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीत 25 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचं उद्दिष्ट; पाच हजार चार्जिंग स्टेशन्स!
- Anand Mahindra : उद्योगपती आनंद महिंद्रांचं नवं पाऊल; आता सुरु करणार मेडिकल काॅलेज
- Anand Mahindra यांनी शब्द पाळला! सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली Bolero