Okaya Electric Scooter: ओकायाने लॉन्च केले 2 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि रेंज
Okaya Electric Scooter: दिवाळीचे निमित्त साधून अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपले वाहन लॉन्च करत आहे. यातच आता इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी Okaya EV ने भारतात आपले दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आहे.
Okaya Electric Scooter: दिवाळीचे निमित्त साधून अनेक वाहन उत्पादक कंपन्या आपले वाहन लॉन्च करत आहे. यातच आता इलेक्ट्रिक दुचाकी निर्माता कंपनी Okaya EV ने भारतात आपले दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आहे. ओकाया फास्ट एफ 2 बी आणि ओकाया फास्ट एफ 2 असे या दोन इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहेत. याची रेंज 85 किमीपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर याची टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. या दोन्ही स्कूटरबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
या स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास F2B ची किंमत 89,999 रुपये आणि F2T ची किंमत 84,999 रुपये आहे. या स्कूटरद्वारे कंपनीला सणासुदीच्या काळात विक्री वाढवायची आहे. ओकाया फास्ट F2B आणि F2T मध्ये 2000W ची मोटर आहे. जी 70 kmph चा टॉप स्पीड देते. F2T एका चार्जवर 85 किमीची रेंज देते. तर F2B एका चार्जवर 70 ते 80 किमीची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर 2.2 kWh लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहेत.
F2B मध्ये बॅटरी पॅक फ्लोअरबोर्डच्या खाली ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे बूट स्पेस वाढते. तर F2T ई-स्कूटरमध्ये बॅटरी रायडरच्या सीटखाली ठेवली आहे. ओकाया ई-स्कूटर भारत भरातील 550 हून अधिक विशेष आऊटलेट्समधून खरेदी केली जाऊ शकते. भारतीय EV स्टार्टअप ओकाया इलेक्ट्रिक व्हेइकल्सने EV एक्स्पो 2021 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर फास्ट लॉन्च केली होती. या हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटरची प्रारंभिक किंमत 90,000 रुपये होती. ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर किमान 150 किमी अंतर कापू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
ओकाया फास्टच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एलईडी लाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी डेटाइम रनिंग लाइट आणि कॉम्बी ब्रेक सिस्टीम यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. ही स्कूटर ताशी 60-70 किमी वेगाने धावू शकते. याव्यतिरिक्त ग्राहक दिवाळी योजनेअंतर्गत कोणत्याही ओकाया ई-स्कूटरच्या खरेदीवर कार, लॅपटॉप, टीव्ही आणि रोख बक्षिसे देत आहे. ही ऑफर 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत वैध असेल.
दरम्यान, अलीकडेच दुचाकी निर्माता कंपनी Komaki आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च केली आहे. Komaki Venice Eeco असं या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. ही एक हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी 79,000 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत भारतात लॉन्च करण्यात आली आहे.