एक्स्प्लोर

Rorr Easy : केवळ 45 मिनिटात 80 टक्के चार्जिंग, 95 किमीचा टॉप स्पीड, किंमत 89,999; ओबेन इलेक्ट्रिकची 'रोर ईझी' बाईक लॉन्च

Oben Electric Rorr Easy : रोर ईझीमध्ये अत्याधुनिक पेटंट केलेले उच्च-कार्यक्षमता एलएफपी बॅटरी तंत्रज्ञान आहे, जे त्याच्या 50 टक्के उच्च तापमान प्रतिरोधकतेसाठी आणि दुप्पट दीर्घ आयुष्यासाठी प्रसिद्ध आहे.

मुंबई: ओबेन इलेक्ट्रिक या एक स्वदेशी संशोधन आणि विकासद्वारे प्रेरित इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांनी, आपली इलेक्ट्रिक मोटरसायकल रोर ईझी लॉन्च करण्याची घोषणा केली आहे जी त्यांच्या लोकप्रिय रोर उत्पादन लाइनमध्ये एक नवीनतम जोड आहे. ती रोजच्या प्रवाशांसाठी राइडचा एक सुलभ आणि सहज अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. शहरी प्रवासाला पुन्हा परिभाषित करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली, रोर ईझी, मर्यादित कालावधीसाठी ८९,९९९ (एक्स-शोरूम) पासून सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. "इंडिया राइड्स ईझी"च्या भावनेला मूर्त रूप देत ही इलेक्ट्रिक मोटरसायकल ईव्ही मार्केटमधील अडथळे दूर करून इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रत्येकासाठी सुलभ करते. ओबेन इलेक्ट्रिकने रोर ईझीसाठी फक्त २,९९९ रुपयांमध्ये तत्काळ बुकिंग सुरू केले असून, स्टोअरमध्ये तत्काळ टेस्ट राइड आणि डिलिव्हरीसह ऑटोमोटिव्ह उद्योगात एक नवीन मापदंड स्थापित केला आहे.

रोर ईझीमध्ये, अंतहीन क्लच आणि गियर शिफ्टिंग, कंपन, हीटिंग, वाढत्या इंधन आणि उच्च देखभाल खर्चासह, शहरातील दैनंदिन रहदारीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहज हाताळणी, आश्चर्यकारक डिजाइन आणि उच्च-कार्यक्षमतेचे तंत्रज्ञान यांचा मिलाफ आहे. २.६ केडब्ल्यूएच, ३.४ केडब्ल्यूएच आणि ४.४ केडब्ल्यूएच या तीन बॅटरी प्रकारांमध्ये उपलब्ध असलेली रोर ईझी, प्रत्येक रायडरच्या विविध गरजा पूर्ण करणारी उत्साहवर्धक आणि आरामदायी राइडिंग प्रदान करते. रोर ईझी इको, सिटी आणि हॅव्हॉक या तीन ड्राईव्ह मोड्समध्ये उपलब्ध असून इलेक्ट्रो अंबर, सर्ज सायन, ल्युमिना ग्रीन आणि फोटॉन व्हाईट या चार रंगात उपलब्ध आहे.

रोर ईझीमध्ये अत्याधुनिक पेटंट केलेले उच्च-कार्यक्षमता एलएफपी बॅटरी तंत्रज्ञान आहे, जे त्याच्या ५०% उच्च तापमान प्रतिरोधकतेसाठी, २ पट दीर्घ आयुष्यासाठी आणि भारताच्या विविध हवामानातील असामान्य विश्वासार्हतेसाठी प्रसिद्ध आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये एलएफपी रसायनशास्त्राचा प्रणेता म्हणून ओबेन इलेक्ट्रिकने इष्टतम कामगिरीसाठी मानक सेट केले आहे, जे बाजारात इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित बॅटरींपैकी एक ऑफर करते. 

रोर ईझीचे सर्व प्रकार, प्रभावी कामगिरी देतात आणि ९५ किमी/ताशी उच्च गती गाठतात आणि केवळ ३.३ सेकंदात ० ते ४० किमी/तास गती प्राप्त करतात.  ५२ एनएमच्या वर्गातील सर्वोच्च टॉर्कसह, रोर ईझी जलद अॅक्सिलरेशन आणि एक उत्साहवर्धक, हॅपी राइडिंग सुनिश्चित करते, ज्यामुळे ती, शहराच्या रहदारीच्या गतिशील लँडस्केपमध्ये फिरण्यासाठी योग्य साथीदार बनते. १७५ किमी (आयडीसी) पर्यंतच्या विस्तारित श्रेणीसह, रोर ईझी सहजतेने शहरातील प्रवासी प्रवाशांच्या गरजा पूर्ण करते, वारंवार चार्जिंगचा त्रास न होऊ देता, प्रवास करण्याचे स्वातंत्र्य प्रदान करते. शिवाय, रोर ईझी जलद-चार्जिंग क्षमतेसह सुसज्ज आहे, ज्यामुळे ती केवळ ४५ मिनिटांत ८०% चार्ज होऊ शकते.

ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ सुश्री मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “ज्या मार्केटमध्ये मोटरसायकलची स्कूटर्सच्या तुलनेत दोनास एक या प्रमाणात विक्री होते तेथे रोर ईझीचे लॉन्च हे भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीचे लोकशाहीकरण करण्याच्या दिशेने आणि सर्वांसाठी विजेचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी एक धाडसी पाऊल आहे. अभिमानाने संपूर्णपणे भारतातच रचनाकृत, अभियांत्रिकीकृत, विकसित आणि उत्पादित केलेली रोर ईझी ही 'मेक इन इंडिया' मोहिमेप्रती आमच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. रोर ईझी ही मोटारसायकलमधील ऑटोमॅटिक राइडिंग या महत्त्वाच्या बदलाचे प्रतीक आहे, जी चालवण्यास सोपे आणि शैलीदार उपाय प्रदान करते आणि रायडर्सना मोबिलिटीच्या भविष्याचा आत्मविश्वासाने स्वीकार करण्यास सक्षम करते.”

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget