नवीन Venue N-Line भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Auto News in Marathi: Hyundai Venue N Line: Hyundai India ने आपली स्पोर्टी कॉम्पॅक्ट SUV Hyundai Venue N-Line भारतात लॉन्च केली आहे.
Hyundai Venue N Line: Hyundai India ने आपली स्पोर्टी कॉम्पॅक्ट SUV Hyundai Venue N-Line भारतात लॉन्च केली आहे. नवीन व्हेन्यू एन-लाइनची एक्स-शोरूम किंमत 12.16 लाख रुपये आहे. ही N6 आणि N8 या दोन प्रकारांमध्ये बाजारात उतरवण्यात आली आहे. N6 प्रकाराची किंमत 12.16 लाख रुपये आहे. तर N8 ची किंमत 13.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. नवीन व्हेन्यू एन-लाइन हे ब्रँडचे दुसरे एन-लाइन उत्पादन आहे. Hyundai i20 N-Line हॅचबॅक ही कंपनीची पहिली N-Line कार होती. ग्राहक 21,000 रुपयांच्या टोकन रक्कमसह ही कार बुक करू शकतात.
व्हेन्यू एन-लाइनला स्टॅंडर्ड मॉडेलपासून वेगळे करण्यासाठी यात काही नवीन डिझाइन एलिमेंट देण्यात आले आहे. व्हेन्यू एन-लाइनच्या बाहेरील भागात बरेच अपडेट पाहायला मिळतील तर. याच्या आतील भागात किरकोळ अपडेट करण्यात आले आहे. कारमधील इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्हेन्यू एन-लाइन स्पोर्टी आणि आकर्षक बनवण्यासाठी, समोर, मागील आणि बाजूंना लाल रंग दिलेले आहेत. कारच्या फ्रंट बंपर, बॅक बंपर, रूफ रेल आणि व्हील आर्चवर लाल रंग दिलेले आहेत. तसेच "N-Line" बॅजिंग त्याच्या पुढील लोखंडी जाळीवर देखील उपलब्ध आहे.
याशिवाय, कारला नवीन 18-इंच डायमंड कट अलॉय व्हील आणि ड्युअल एक्झॉस्ट टीप देखील मिळतात. स्पोर्टी लूकसाठी फ्रंट डिस्क ब्रेकमध्ये लाल कॅलिपर बसवण्यात आले आहेत. याशिवाय एन-लाइनमध्ये एक्झॉस्ट व्हॉल्यूम देखील वाढविला गेला आहे. इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, केबिनला काळ्यासह लाल रंग देण्यात आला आहे. याच्या इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सेंट्रल कन्सोलवर रेड अॅक्सेंट देण्यात आला आहे. याला एक नवीन स्पोर्टी स्टीयरिंग व्हील देखील मिळतो, ज्याला लाल रंग देण्यात आला आहे.
फीचर्स
व्हेन्यू एन-लाइनमध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 8-इंच टचस्क्रीन, कनेक्टेड कार टेक, अॅम्बियंट लाइटिंग, पॉवर ड्रायव्हर सीट, इंटिग्रेटेड एअर प्युरिफायर, व्हॉइस कमांड्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बोस साउंड सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यात एकाधिक रेकॉर्डिंग पर्यायांसह डॅश कॅमेरा देखील मिळतो.
इंजिन
Hyundai Venue N-Line हे 1.0-लिटर टर्बो GDI पेट्रोल इंजिनला ड्युअल क्लच ट्रान्समिशन (DCT) शी जोडलेले आहे. हेच इंजिन आणि गिअरबॉक्स स्टँडर्ड व्हेन्यू स्पोर्ट्समध्ये उपलब्ध आहेत. हे इंजिन 118.35 Bhp पॉवर आणि 172 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 7-स्पीड DCT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. नवीन व्हेन्यू एन-लाइन 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तीन ड्युअल टोन आणि दोन मोनोटोन कलर पर्यायांचा समावेश आहे.