Maruti Celerio 2021 : मारुतीची सेलेरियो गाडी लाँच, 26 KM चा मायलेज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Maruti Celerio 2021 : मारुती सुजुकीने (Maruti Suzuki) आपली बहुप्रतीक्षित हॅचबॅक सेलेरियो कार लाँच केली आहे. कंपनीनं सेलेरियो या गाडीला 4.99 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किंमतीसह लाँच केलं आहे.
Maruti Celerio 2021 : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुजुकीने (Maruti Suzuki) आपली बहुप्रतीक्षित हॅचबॅक सेलेरियो (Celerio 2021) कार लाँच केली आहे. कंपनीनं सेलेरियो या गाडीला 4.99 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किंमतीसह लाँच केलं आहे. या गाडीची किंमत 6.94 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे.
26 KM चा मायलेज –
तरुण मतदारांना आकर्षीत करण्यासाठी मारुतीनं आपल्या सेलेरियो 2021 ही कार आणली आहे. या कारमध्ये 7-इंच टचस्क्रीन कंसोल, स्टार्ट आणि स्टॉपसाठी पुश बटन, ऑटो इंजन स्टार्ट / स्टॉप, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील यासारखे अनेक खास फिचर्स देण्यात आले आहेत. मारुती सुजुकी सेलेरियो 2021 ही फायर रेड आणि स्पीडी ब्लू या रंगात उपलब्ध असणार आहे. कंपनीनं दावा केलाय की, ही कार 26.68 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देईल.
फिचर्स -
सेलेरियो 2021 या कारमध्ये क्रोम बारसोबत नवीन ग्रिल देण्यात आलं आहे. ज्याची लांबी स्वेप्ट-बॅक हेडलँप, LED हेडलाइट्स, नवीन बंपर आणि फ्लेअर्ड व्हील आर्चपर्यंत असेल. हे इंटेरिअर ऑल-ब्लॅक थीममध्ये असेल. पूर्ण केबिनमध्ये फॉक्स अॅल्युमिनिअम अॅक्सेंट, व्हर्टिकल AC वेंटसह अनेक फिचर्स असतील.
अॅप्पल कारप्ले आणि अॅड्रॉएड ऑटो सपोर्ट
सेलेरियो या नव्या गाडीमध्ये अधिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न मारुतीकडून करण्यात आलाय. सेलेरियो गाडीत दोन फ्रंट एअर बॅग, एबीएस आणि कंसोल पॅनलवर कॅमेऱ्यासोबत रिवर्सिंग सेन्सर असेल. मनोरंजनासाठीही खास सोय करण्यात आली आहे. कारमध्ये अॅप्पल कारप्ले आणि अॅड्रॉएड ऑटो सपोर्टची सोय करण्यात आली आहे. मारुती सुजुकी सेलेरियो 2021 मध्ये 1.0-लीटर थ्री-सिलेंडर K10c पेट्रोल इंजन देण्यात आलं आहे. ट्रान्समिशन ऑप्शन, 5 स्पीड मॅनुअल गियरबॉक्स आणि 5 स्पीड AMT. आयडल स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानाचासोबत डुअल जेट, डुअल VVT के-सीरीज इंजन 3500rpm वर 89Nm चा टॉर्क आणि 6000rpm वर 50kW पॉवर करतो.
11 हजार रुपयांत करा बुक –
मारुती सुजुकी सेलेरियो या गाडीला कंपनीच्या अधिकृत www.marutisuzuki.com/celerio या संकेतस्थळावरुन 11 हजार रुपयांत बुक करु शकता. एक आठवड्यापूर्वी या गाडीची बुकिंग सुरु करण्यात आली आहे.
संबंधित वृत्त:
Electric car in India : भारतात Hyundai इलेक्ट्रिक कार Ioniq 5 EV लाँच होणार ?
New Electric car launching in India भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत 'या' कंपनीची एन्ट्री
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha