(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Electric car launching in India भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत 'या' कंपनीची एन्ट्री; जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही!
इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारच्या निर्मिती करणाऱ्या BYD कंपनीने भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केले आहे. BYD ने इलेक्ट्रि्क कार लाँच केली असून भारतातील काही शहरात कार विक्रीसाठी उपलब्ध आहे.
नवी दिल्ली: भविष्यातील कार बाजारपेठेतील स्पर्धा आता तीव्र होणार आहे भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक कंपन्या सरसावल्या आहेत. टाटा मोटर्स, मारुती- सुझुकी, एमजी आदी कंपन्यामध्ये स्पर्धा सुरू असताना आता आणखी एका दिग्गज कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी आपली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. चीनमधील कंपनी BYD ने भारतात इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. BYDची कार e6 MPV या नावाने लाँच झाली आहे.
BYD ही कंपनी इलेक्ट्रिक कार आणि हायब्रीड कारच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. e6 MPV कारमध्ये 71.7 kWh क्षमतेची ब्लेड बॅटरी आहे. कार एकदा चार्ज केल्यानंतर 520 किमी (शहरात) आणि 415 किमी (एकत्रित) अंतरापर्यंत धावू शकते. एकाच वेळी चार्जिंग केल्यानंतर सर्वाधिक अंतर पार करणारी ही कार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 70kWh इलेक्ट्रिक मोटर 180 Nm चा टॉर्क निर्माण करतो. तर, या कारचा सर्वाधिक वेग हा 130 किमी प्रति तास इतका आहे.
BYD ची e6 इलेक्ट्रिक कार दिल्ली एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, विजयवाडा, अहमदाबाद, कोची आणि चेन्नई आदी शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. e6 MPV कार ही एसी आणि डीसी या दोन्हीवर चार्ज होण्यास सक्षम आहे. डीसी फास्ट चार्जिंगवर असताना अवघ्या 35 मिनिटांमध्ये 30 टक्क्यांहून 80 टक्क्यांपर्यंत कार चार्ज होणार आहे.
या कारची बूट क्षमता ही 580 लीटर असल्याचा दावा BYD ने केला आहे. त्याशिवाय लेदर सीट्स, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर आणि फ्रंट सीट्स, 10.1 इंचाची रोटेबल टच स्क्रिन, एअर फिल्टर. स्पीड सेन्सिंग ऑटोमॅटिक लॉकिंग आणि डिस्टन्स स्केल लाइनसह रिअरव्ह्यू कॅमेरा यासारखे फिचर्स कारमध्ये आहेत.
BYD ने आपल्या e6 इलेक्ट्रिक कारवर तीन वर्ष अथवा एक लाख 25 हजार किमी अंतर इतकी वॉरंटी असणार आहे. बॅटरी सेलची वॉरंटी ही आठ वर्ष अथवा पाच लाख किमी इतकी असणार आहे. ट्रॅक्शन मोटर वॉरंटी ही आठ वर्ष अथवा 1 लाख 50 हजार किमी इतके असणार आहे. सध्या काही मोजक्या शहरांमध्ये कार विक्री असून एक्स-शोरुम किंमत 29 लाख 60 हजार इतकी असून यामध्ये 7kW चार्जरचाही समावेश आहे. तर, 7kW चार्जरशिवाय 29 लाख 15 हजार इतकी किंमत असून B2B मार्केटमध्ये उपलब्ध आहे. BYD कंपनीचे भारतात दोन कारखाने असून भविष्यात आणखी कार निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे.