New Baleno 2022 : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी लॉन्च होणार मारुतीची नवीन 'बलेनो फेसलिफ्ट' कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स
New Baleno 2022 : देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन 2022 'बलेनो फेसलिफ्ट' कार भारतात लॉन्च करणार आहे.
New Baleno 2022 : देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन 2022 'बलेनो फेसलिफ्ट' (Maruti Baleno Facelift ) कार भारतात लॉन्च करणार आहे. ही कार लॉन्च होण्याआधीच याचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत बलेनो फेसलिफ्टमध्ये कंपनीने अनेक नवीन अपडेट केले असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच कंपनीने यामध्ये बरेच नवीन फीचर्स देखील दिले आहेत. चला तर या कारच्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
आधीच्या मॉडेलपेक्षा आकाराने असेल मोठी
नवीन बलेनो फेसलिफ्ट ही आधीच्या मॉडेलपेक्षा आकाराने मोठी असू शकते. कंपनीने याच्या लूकमध्ये बरेच बदल केले आहेत. या कारच्या फोटोंमध्ये दिसत असल्या प्रमाणे यात नवीन एलईडी डीआरएल लाईट सिग्नेचर असलेल्या मोठ्या हेडलॅम्पसह बोनेट देण्यात आले आहे. याची ग्रीलही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलपेक्षा मोठी असल्याचे दिसत आहे. याच्या ग्रीलच्या खालील भागात सिल्व्हर स्ट्रीप बेस असल्याचे दिसत आहे. मारुतीने फॉग लॅम्पलाही फ्रंट बंपरमध्ये नवीन लूकसह दिला आहे. या कारमध्ये कंपनीने नवीन16-इंच डायमंड कट अलॉय दिले आहेत, जे जुन्या बलेनोपेक्षा दिसायला अधिक आकर्षक आहे. या कारचे इंटिरियर पूर्णपणे नवीन आणि अपडेटेड आहे. कंपनीने यात नवीन इंफोटेनमेंट सिस्टमसह एक मोठी टचस्क्रीन दिली आहे. असे असले तरी ग्राहकांना यात संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळत नाही. यात मल्टी टाइल मेनू सिस्टीमसह 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
फीचर्स
बलेनोच्या जुन्या मॉडेलमध्ये फीचर्सचा अभाव पाहायला मिळतो. मात्र नवीन बलेनोमध्ये कंपनीने मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक, हेड्स अप डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग, 360° व्ह्यू कॅमेरा, क्लायमेट कंट्रोल, रीअर सेन्सर्स, रिअर एसी व्हेंट्स, पॉवर फोल्डिंग मिरर आणि 6 एअरबॅग सारखे फीचर्स दिले आहे. मात्र या कारमध्ये ग्राहकांना सनरूफ मिळणार नाही.
इंजिन पर्याय
नवीन बलेनोमध्ये ग्राहकांना स्टार्ट/स्टॉप फीचर्ससह सिंगल 1.2 लिटर पेट्रोल इंजिन पर्याय मिळेल. ज्यामुळे इंधनाची बचत होते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल.
नवीन किंमतसह या दिवशी होणार लॉन्च
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बलेनोची किंमत 6 ते 9.6 लाख रुपयांदरम्यान आहे. मात्र नवीन बलेनोच्या टॉप-एंड ट्रिमला जोडलेल्या फीचर्समुळे याच्या किंमतीत 50 हजार रुपयांची वाढ होऊ शकते. कंपनीची ही नवीन कार 23 फेब्रुवारी रोजी लॉन्च होणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha