नवीन Hyundai Venue Facelift येतेय, मिळणार हे जबरदस्त फीचर्स
2022 Hyundai Venue Facelift: Hyundai ची सर्वात लोकप्रिय छोट्या आकाराची SUV व्हेन्यू भारतात खूप यशस्वी ठरली आहे. कंपनी आता याचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे.
![नवीन Hyundai Venue Facelift येतेय, मिळणार हे जबरदस्त फीचर्स New Hyundai Venue Facelift is coming, you will get these awesome features नवीन Hyundai Venue Facelift येतेय, मिळणार हे जबरदस्त फीचर्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/27/98718a7d3e842aa23694a271ec726ae4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
2022 Hyundai Venue Facelift: Hyundai ची सर्वात लोकप्रिय छोट्या आकाराची SUV व्हेन्यू भारतात खूप यशस्वी ठरली आहे. कंपनी आता याचा अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन Hyundai Venue Facelift 16 जून रोजी भारतीय बाजारपेठेत सादर केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये तुम्हाला एक्सटीरियर आणि इंटीरियर व्यतिरिक्त अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील.
नवीन व्हेन्यूचा फ्रंट लुक Hyundai Tucson सारखा असेल. कारच्या पुढील बाजूस नवीन लोखंडी जाळी दिसेल. यात नवीन डिझाईन केलेल्या हेडलँपसोबत फॉग लॅम्प आणि टर्न सिग्नल इंडिकेटरही दिसतील.
स्टायलिश लूक आणि जबरदस्त फीचर्स
नवीन Hyundai व्हेन्यूच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, यात नवीन ग्रिल मिळेल. या कारमध्ये तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रिक सनरूफ, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेच्या कनेक्टिव्हिटीसह 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वन टच डाउन ड्रायव्हर साइड पॉवर विंडो यासारखे फीचर्स पाहायला मिळतील. नवीन व्हेन्यूला ड्युअल-टोन अलॉय व्हील्स मिळतील. नवीन स्प्लिट एलईडी टेललॅम्पसह मागील भागात Ioniq5 सारखे एलिमेंट्स दिले जाऊ शकतात.
इंजिन
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर नवीन Hyundai Venue Facelift 2022 मध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 1.5 लिटर डिझेल इंजिन आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये देखील येऊ शकते. या तिन्ही व्हर्जनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला जाऊ शकतो.
सेफ्टी फीचर्स
नवीन Hyundai Venue Facelift मध्ये सुरक्षा फीचर्सवरही भरपूर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम या सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यात तुम्हाला 8 स्पीकरसह बोस साउंड सिस्टम मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)