नवीन Hyundai Tucson भारतात लॉन्च, जबरदस्त फीचर्ससह किंमत आहे...
Hyundai Tucson Launched: दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने देशात आपली नवीन Tucson एसयूव्ही लॉन्च केली आहे. ही फोर्थ जनरेशन Tucson आहे.
Hyundai Tucson Launched: दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी Hyundai ने देशात आपली नवीन Tucson एसयूव्ही लॉन्च केली आहे. ही फोर्थ जनरेशन Tucson आहे. ज्याची किंमत कंपनीने 27.69 लाख रुपय ठेवली आहे. कंपनीने नवीन Tucson प्लॅटिनम आणि सिग्नेचर या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीच्या या कारला लॉन्च होण्याआधीच 3000 बुकिंग मिळाली आहेत. ग्राहक 50,000 रुपयांच्या टोकन रकमेसह ही कार बुक करू शकतात.
नवीन Hyundai Tucson ला पॅरामेट्रिक ज्वेल पॅटर्नमध्ये नवीन लोखंडी ग्रील देण्यात आली आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंना LED DRL लावण्यात आले आहेत. साईड पार्टबद्दल बोलायचे झाले तर याला शार्प कट्स आणि क्रीज देण्यात आले आहेत. जे याला स्पोर्टी लूक देतात. या कारच्या मागील बाजूस, LED पट्टीसह दोन्ही बाजूंना LED टेललाइट्स दिले आहेत. मागील बंपरवर ब्रेक लाईट्स आणि फॉक्स सिल्व्हर रंगीत स्किड प्लेट्स देण्यात आल्या आहेत. ही कार सात रंगात लॉन्च करण्यात आली असून ज्यात 5 मोनो टोन - पोलर व्हाइट, फॅंटम ब्लॅक, फायरी रेड, स्टाररी नाईट आणि ग्रे, दोन ड्युअल टोन, ब्लॅक अँड व्हाईट, रेड अँड ब्लॅक रंगाचा समावेश आहे.
नवीन Hyundai Tucson च्या इंटीरियरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, व्हॉईस कमांड, अॅम्बियंट साउंड, वॉल मोड, ब्लूलिंक कनेक्टेड तंत्रज्ञान, बोस 8 स्पीकर साउंड सिस्टम, सनरूफ, हँड्स फ्री स्मार्ट पॉवर टेल गेट, ड्रायव्हर पॉवर सीट मेमरी फंक्शन दिले आहे.
ग्राहकांच्या सुविधेसाठी यात वायरलेस फोन चार्जर, रिमोट इंजिन की, सेकंड रो रेक्लाइन फंक्शन, मोठा बूट स्पेस, पॅसेंजर सीट वॉक-इन डिव्हाइस, सेकंड रो फोल्डिंग सुविधा, 60:40 स्प्लिट फोल्डिंग रिअर सीट आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्ज, ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
इंजिन पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Hyundai Tucson मध्ये 2.0-लीटर पेट्रोल इंजिन आहे. जे 156 bhp पॉवर आणि 192 न्यूटन मीटर टॉर्क जनरते करते. यात 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. यात 2.0-लिटर डिझेल इंजिन पर्याय ही आहे. जे 186 bhp पॉवर आणि 416 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. भारतात याची स्पर्धा Jeep Compass, Volkswagen Tiguan, Skoda Kodiaq, Mahindra XUV700 आणि Citroen C5 Aircross सारख्या कारशी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Hyundai Discount Offers: रक्षाबंधनाला Hyundai ची डिस्काऊंट ऑफरची भेट, जाणून घ्या खास संधीबाबत
- Maruti Alto K10 First Look Review: येत आहे नवीन Maruti Alto K10, Celerio पेक्षा कमी असेल किंमत?