Engine Overheat : इंजिन जास्त गरम होऊन गाडी मध्येच बंद पडली तर काय कराल? आधी 'हे' काम करा
Engine Overheat : कार चालवताना इंजिन जास्त तापले तर त्याची साधारणपणे तीन कारणे असू शकतात.
Engine Overheat : कारमध्ये (Car) इंजिनला फार महत्त्व असतं. कारण जर इंजिन (Engine) खराब झालं तर कमी अंतरावरही गाडी चालवताना खूप त्रास होतो. तसेच, प्रवासाच्या मध्यभागी जर इंजिन जास्त तापू लागलं तरीदेखील प्रवास करणं फार कठीण होतं. यासाठीच जर प्रवासाच्या दरम्यान इंजिन जास्त गरम होत असेल तर अशा कोणत्या गोष्टी कराव्यात ते जाणून घेऊयात.
इंजिन जास्त गरम का होतं?
खरंतर, कार चालवताना इंजिन जास्त तापण्याची तीन कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे, प्रवासात मध्येच ब्रेक न घेता जास्त वेळ कार चालवणे. याशिवाय दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे उष्ण वातावरणात कार चालवतानाही इंजिनचे तापमान सामान्यपेक्षा जास्त असू शकते. आणि तिसरं कारण म्हणजे जर तुमची कार लिकेज झाली असेल तर कारमधील इंजिन गरम होतं.
इंजिन जास्त गरम झाल्यावर 'हे' काम करा
जर तुमच्या कारमध्ये इंजिन जास्त गरम होण्याची समस्या येत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात आधी, इंजिन जास्त तापलं तर कार चालवू नका. असे केल्यास इंजिनचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे गाडी तात्काळ सुरक्षित ठिकाणी थांबवावी.
रेडिएटर कॅप उघडू नका
सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवल्यानंतर रेडिएटर कॅप कधीही उघडू नका. जर कोणी असं केलं तर इजा होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कार चालवल्यानंतर रेडिएटर कॅप कधीही ओपन करू नका असा इशाराही अनेक कंपन्या देतात. असे केल्याने, रेडिएटरमध्ये असलेले गरम शीतलक बाहेर येते आणि अपघाताचा धोका वाढतो.
लिकेज चेक करा
जर कारचं इंजिन जास्त गरम होत असेल तर लिकेजसुद्धा तपासणं गरजेचं आहे. कारमधून कुठूनही कूलंट लीक होत असले तरी, कार चालवताना जास्त गरम होण्याची समस्या उद्भवते. जर तुम्हाला वेळीच अंदाज येत नसेल तर गाडी गॅरेजमध्ये नेऊन तपासा. तसचे, गाडीला वेळोवेळी सर्व्हिसिंग करणं देखील फार गरजेचं आहे. यामुळे कार लवकर बिघडत नाही तसेच कारची शेल्फ लाईफही वाढते.
जर, तुम्ही ही काळजी घेतली तर तुम्हाला इंजिन गरम होण्याचा तसेच लिकेज होण्याचा त्रास भासणार नाही. आणि तुमची कारही सुरक्षित राहील.
महत्त्वाच्या बातम्या :