ई-मोबिलिटीची 'वान' (VAAN) इलेक्ट्रिक मोटो बाईक भारतात लॉन्च
ई-बाईक दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे- अर्बनस्पोर्ट आणि अर्बनस्पोर्ट प्रो, अनुक्रमे 59,999 आणि 69,999 रुपये किंमतीची गाडी आहे.

मुंबई : इंडियन लाईफ स्टाईल ई-मोबिलिटीने 'वान' इलेक्ट्रिक मोटो प्रायव्हेट लिमिटेडने देशात आपली इलेक्ट्रिक सायकल-अर्बनस्पोर्ट लॉन्च केली आहे. सुटसुटीत, लहान आणि सर्वांना आवडेल अशी ही बाईक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. केंद्रीय कौशल्य विकास, उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी कोची येथे एका कार्यक्रमात व्हॅन इलेक्ट्रिक मोटो ब्रँड भारतात लॉन्च केला. ही ई-बाईक दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे- अर्बनस्पोर्ट आणि अर्बनस्पोर्ट प्रो, अनुक्रमे 59,999 आणि 69,999 रुपये किंमतीची गाडी आहे. गोवा, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद, दिल्लीमध्ये ही गाडी विक्रीला आणण्याआधी कोचीमध्ये याची विक्रीसाठी सुरू केली जाईल. या बाईकचा टॉप स्पीड 25 किमी/ता, आणि 60 किलोमीटर पर्यंतची पेडल असिस्टेड रेंज मिळू शकते
वानचा दावा आहे की, पूर्ण चार्ज करण्यासाठी फक्त अर्धा युनिट वीज लागेल, ज्याची किंमत सुमारे 4-5 रुपये आहे. सोबतच रिमूव्हेबल बॅटरी पॅक आणि या बॅटरीचं निव्वळ वजन 2.5 किलो आहे. बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी चार तास लागतील. एर्नाकुलमचे खासदार हिबी ईडन यांनी वानच्या ब्रँड लोगोचे अनावरण केले ज्यामध्ये माजी खासदार चंद्रन पिल्लई देखील उपस्थित होते. दोन्ही इलेक्ट्रिक बाइक्स मध्ये कॉम्पॅक्ट 6061 अॅल्युमिनियम युनिसेक्स फ्रेम्स, सॅडल, रिम्स आणि हँडल बार इटालियन ब्रँडची ई-बाईक व्हर्टिकल बेनेली बिसिक्लेटने डिझाइन केलेले आहेत.
वानने दावा केला आहे की, तिची रिमुव्हेबल बॅटरी या सेगमेंटमध्ये पहिली आहे, सायकली शिमॅनो टूर्नी 7 स्पीड डेरेल्युअर गियर सिस्टम, फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्स आणि स्पिनर यूएसए फ्रंट शॉकसह येतात. इलेक्ट्रिक पेडल असिस्ट सिस्टममध्ये 250W हब माउंटेड इलेक्ट्रिक मोटर, 48 व्होल्ट, 7.5 Ah काढता येण्याजोगी लिथियम-आयन बॅटरी आणि एकूण 5 इलेक्ट्रिक 'गियर लेव्हल्स' आहेत. वान अर्बनस्पोर्ट ई-बाइकला सर्व आवश्यक माहिती देणारा स्मार्ट LCD डिस्प्ले मिळतो, ज्याचा उपयोग पुढील आणि मागील दिवे नियंत्रित करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
अर्बनस्पोर्ट ही दोनपैकी सर्वात व्यावहारिक आहे आणि तिला 20 इंच स्पोक व्हील, 15 किलोग्रॅमपर्यंत वाहून नेणारी वाहक आणि एक उघडकीस इलेक्ट्रिक मोटर मिळते. अर्बनस्पोर्ट प्रो ही अधिक स्टायलिश आणि प्रीमियम ई-बाईक आहे जी अलॉय व्हील आणि इलेक्ट्रिक मोटर देते. कंपनीच्या एर्नाकुलम येथील प्लांटमध्ये महिन्याला 2,000 सायकल असेंबल करण्याची क्षमता आहे आणि सुरुवातीला ते वर्षभरात 8,000 ते 10,000 सायकल विक्रीचे लक्ष्य ठेवत आहेत. अगदी ज्यांचे वय 40-55 वयोगटातील ज्यांना सायकलिंगची आवड नाही ही गाडी आवडू शकते असा दावा कंपनीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- एथनिक वेअर कंपनी 'फॅब इंडिया' आयपीओसाठी कागदपत्रं देणार, आयपीओतून कंपनीला 20 हजार कोटी मूल्यांकन अपेक्षित
- रोल रॉइस प्रदर्शित करणार जगातली सर्वात महागडी कार, किंमत आणि फीचर्स जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
- Delhivery, रेडियंट कॅश मॅनेजमेंट आणि व्हरांडा लर्निंग सोल्युशन्सच्या IPOला ग्रीन सिग्नल
वान कंपनी म्हणते की, दोन वर्षांच्या वॉरंटीसह सुमारे 2.50 किलो वजनाची लिथियम-आधारित काढता येण्याजोगी बॅटरी सुमारे चार तासांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते आणि सायकल ज्या मोडमध्ये वापरली जाते त्यानुसार ती 50 किमी ते 60 किमीपर्यंत टिकते. हे इटलीतील EICMA मोटरसायकल शोमध्ये जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले. वानची सुप्रसिद्ध मोटरसायकल उत्पादक ब्रँड बेनेली सोबत तंत्रज्ञान भागीदारी आहे.
























