किंमत 5.54 लाख, अॅव्हरेज 34 KM; सर्वाधिक विक्री होणाऱ्या 'या' कारवर 49 हजारांची सूट
मारुती सुझुकीच्या गाड्या चांगल्याच लोकप्रिय होत आहेत. या गाड्यांना लोकांची चांगली पसंती मिळत आहे.
Maruti Suzuki WagonR: ग्राहकांमध्ये मारुती सुझुकीच्या गाड्या चांगल्याच लोकप्रिय आहेत. या गाड्यांना लोकांची चांगली पसंती मिळत आहे. Maruti Suzuki WagonR या कारची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या महिन्यात या कारने विक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या कारच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. विशेष म्हणजे अॅव्हरेजच्या बाबतीत ही गाडी चांगली आहे.
49 हजार रुपयांपर्यंत सूट
या सणासुदीच्या सीझनमध्ये ऑटो कंपन्याही त्यांच्या लोकप्रिय असणाऱ्या गाड्यांवर बंपर डिस्काउंट देत आहेत. जर तुम्ही मारुती सुझुकीचे हॅचबॅक मॉडेल WagonR खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला या कारवर पैसे वाचवण्याची उत्तम संधी आहे. मारुती WagonR गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. सध्या मारुतीच्या या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक मॉडेलवर कंपनी 49 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. या महिन्यात नोव्हेंबरमध्ये तुम्हाला कंपनीकडून मारुती सुझुकीच्या या कारवर 25,000 रुपयांपर्यंत रोख सूट, जुनी कार दिल्यावर 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट मिळेल. याचा अर्थ जर तुम्ही या महिन्यात ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 49 हजार रुपये वाचवू शकता.
एक किलो CNG मध्ये ही कार 34 किलोमीटर
मागील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये ग्राहकांची पहिली पसंती ठरलेल्या या हॅचबॅकने एकूण 22 हजार 80 युनिटची विक्री केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विक्रीचा आकडा 17 हजार 945 युनिट्स होता. दोन्ही आकडेवारी पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की, ग्राहकांमध्ये या कारची प्रचंड क्रेझ होती. त्यामुळे या कारची विक्री वर्षानुवर्षे वाढत असल्याचे दिसत आहे. या कारच्या विक्रीत 23 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मारुती सुझुकीची वॅगनआरची खरेदी करायची असेल तर तुम्हाला 5 लाख 54 हजार 500 रुपये मोजावे लागतील. मारुती सुझुकीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की 1 लीटर पेट्रोलमध्ये ही कार 24.35 किलोमीटर जाते. तर एक किलो CNG मध्ये ही कार 34 किलोमीटर जाते.
महत्त्वाच्या बातम्या:
मारुती सुझुकीच्या गाड्या चांगल्याच लोकप्रिय आहेत. या गाड्यांना लोकांची चांगली पसंती मिळत आहे.