मारुतीने केला नवा विक्रम, दररोज तब्बल एवढ्या गाड्यांची विक्री; 'या' गाड्यांना सर्वांची पसंती
मारुती कंपनीला देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे असं म्हटलं जातं. लोकांना मारुतीच्या छोट्या वाहनांपेक्षा Brezza, Grand Vitara, Ertiga आणि XL6 या युटिलिटी सेगमेंटला अधिक पसंती आहे.
Maruti Sales in October: मारुती कंपनीला देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे असं म्हटलं जातं. लोकांना मारुतीच्या छोट्या वाहनांपेक्षा Brezza, Grand Vitara, Ertiga आणि XL6 या युटिलिटी सेगमेंटला अधिक पसंती आहे. ऑक्टोबरमध्ये या वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात या कंपनीनं तब्बल 6 हजार 640 गाड्या विकल्या आहेत.
देशातील बाजारात कितीही कंपन्या आल्या तरीही लोक मारुतीच्या गाड्या खरेदी करत आहेत. हे मिळालेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. मारुतीनं कार विक्रीच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाची विक्री ऑक्टोबरमध्ये वार्षिक आधारावर 19 टक्क्यांनी वाढली आहे. 1 लाख 99 हजार 217 युनिट्स झाली आहे. कंपनीचा हा सर्वाधिक मासिक विक्रीचा आकडा आहे. या विक्रीसह मारुतीने नवा विक्रम केला आहे. कंपनीने बुधवारी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत बाजारात तिची विक्री 1 लाख 77 हजार 266 युनिट्स इतकी झाली आहे, जी आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीची देशांतर्गत विक्री 1,47,072 युनिट्स होती. अशा प्रकारे देशांतर्गत बाजारात कंपनीची विक्री 21 टक्क्यांनी वाढली आहे.
प्रवासी वाहनांची विक्रीही वाढली
प्रवासी वाहनांबद्दल बोलायचे झाले तर, इथेही कंपनीनं वेगाने वाढ नोंदवली आहे. देशांतर्गत बाजारात कंपनीची प्रवासी वाहन विक्री ऑक्टोबर, 2023 मध्ये 1 लाख 68 हजार 47 युनिट्सपर्यंत वाढवली आहे. जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 1 लाख 40 हजार 337 युनिट्स होती. मात्र, या काळात कंपनीच्या मिनी कार आणि एस-प्रेसोची विक्री 14 हजार 568 युनिट्सवर घसरली. वर्षभरापूर्वी मिनी कारची विक्री 24 हजार 936 युनिट्स होती. तर कॉम्पॅक्ट युनिट्समध्ये, कंपनीची बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआरची विक्री 73,685 युनिट्सवरून 80,662 युनिट्सपर्यंत वाढली आहे.
ज्या सेगमेंटने मारुतीच्या विक्रीत जोरदार उडी घेतली आहे. तो म्हणजे युटिलिटी सेगमेंट. कंपनीने या विभागातील विक्रीत 91 टक्क्यांची मजबूत वाढ पाहिली आहे. कंपनीने या सेगमेंटमध्ये 91 टक्के वाढीसह 59 हजार 147 वाहनांची विक्री केली आहे. यापूर्वी या सेगमेंटची विक्री 30 हजार 971 युनिट्स होती. कंपनीची प्रसिद्ध वाहने Brezza, Grand Vitara, Ertiga आणि XL6 मॉडेल या सेगमेंटमध्ये येतात. कंपनीने निर्यातीच्या आघाडीवरही चांगली वाढ नोंदवली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये कंपनीची निर्यात 21 हजार 951 युनिट्सपर्यंत वाढली आहे. जी मागील वर्षी याच महिन्यात 20 हजार 448 युनिट्स होती.
महत्त्वाच्या बातम्या: