Hydrogen Car: BMW लॉन्च करणार हायड्रोजनवर धावणारी कार, जाणून घ्या काय असेल खास
BMW Hydrogen Car: जर्मनीची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी BMW आपल्या लक्झरी कारसाठी ओळखली जाते. आता कंपनी पेट्रोल आणि डिझेलसारख्या पारंपारिक इंधनांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन हायड्रोजनवर धावणाऱ्या कारवर काम करत आहे.
BMW Hydrogen Car: जर्मनीची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी BMW आपल्या लक्झरी कारसाठी ओळखली जाते. आता कंपनी पेट्रोल आणि डिझेलसारख्या पारंपारिक इंधनांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन हायड्रोजनवर धावणाऱ्या कारवर काम करत आहे. गाड्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्दिष्ठाने कंपनी ही कार आणणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
कंपनीची पहिली हायड्रोजन कार लवकरच येणार
कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे माहिती दिली आहे की, बीएमडब्ल्यू लवकरच हायड्रोजन इंधन असलेली कार जगासमोर आणू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, बीएमडब्ल्यू हायड्रोजनवर धावणाऱ्या कारच्या तंत्रज्ञानाकडे वेगाने वाटचाल करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या वर्षाच्या अखेरीस BMW iX5 ही हायड्रोजन कारची (Hydrogen Car) एक छोटी सीरीज रिलीज करेल. ज्यामध्ये या कारचे टेस्टिंग आणि परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. कंपनीने सोशल मीडियावर जारी केलेल्या पोस्टमध्ये या एसयूव्हीचे काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ही कार निळ्या रंगात दिसत आहे. या कारचे बोनेट, गेट, बंपर आणि चाके देखील निळ्या रंगाची आहेत. BMW ने या कारमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल हायलाइट केला आहे.
हायड्रोजन हे भविष्यातील इंधन मानले जाते
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारपेक्षा प्रदूषणमुक्त इंधनाचा प्रचार करतात. काही काळापूर्वीच देशातील पहिली फ्लेक्स इंधनावर चालणारी कार सादर करण्यात आली होती. दरम्यान, अलीकडेच प्रसिद्ध कार निर्माता कंपनी टोयाटोने ग्रीन हायड्रोजनवर इंधनावर धावणारी Toyota Mirai कार लॉन्च केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्तेच या कारचं उद्घाटन करण्यात आलं होतं. ही कार टोयोटा कंपनी आणि किर्लोस्कर (Toyota Kirloskar) यांनी मिळून तयार केली आहे. तसेच काही महिनायनपूर्वी लग्झरी कार निर्माता कंपनी फेरारीनं हायड्रोजनवर (Hydrogen Car) चालणारी कार लॉन्च करण्याचे संकेत दिले होते. इटालियन सुपर कार निर्माती कंपनी फेरारी हायड्रोजन (Hydrogen Car) सेलपासून विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. मात्र कंपनीच्या या कराबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या :
Diwali 2022: दिवाळीआधी टीव्हीएस करणार धमाका, नवीन अपडेटसह येत आहे TVS Raider 125