Hydrogen Cars Vs Electric Cars: हायड्रोजन कार इलेक्ट्रिक कारपेक्षा चांगली आहे का? जाणून घ्या...
Hydrogen Cars Vs Electric Cars: हायड्रोजन कार चांगली की इलेक्ट्रीक कार असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. जाणून घेऊयात कोणती कार आहे सरस...
Hydrogen Cars Vs Electric Cars: काही दिवसांपूर्वी केद्रींय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोयोटा मिराई हायड्रोजन कारमधून प्रवास करत संसदेच्या अधिवेशनाला उपस्थिती दर्शवली होती. या दरम्यान, स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या कारबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. हायड्रोजन कार ही इलेक्ट्रीक कारपेक्षा चांगली आहे का, असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित राहिला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ज्या हायड्रोजन कारने संसदेत पोहोचले ती टोयोटा कंपनीच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत बनवण्यात आली आहे. टोयोटाने या कारमध्ये अत्याधुनिक फ्यूल सेल बसवला आहे. याद्वारे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे मिश्रण करून वीज निर्माण करेल. त्यातून ही कार धावणार. ही कार धुराऐवजी फक्त पाणी सोडते.
नितीन गडकरी यांनी सांगितले होतो की, हायड्रो फ्युएल सेलमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ही कार आपल्या देशाचे भविष्य आहे, असेही सांगण्यात आले. जपानी भाषेतील 'मिराई' या शब्दाचा अर्थ भविष्य असा होतो.
मिराज हायड्रोजन कारचे वैशिष्ट्ये
मिराई एक हायड्रोजन फ्यूल सेल कार आहे. यामध्ये तीन हायड्रोजन टँक आणि फ्यूल सेल लावण्यात आले आहेत. कारसाठी एक लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रीक मोटरदेखील आहे. तीन हायड्रोजन टँकदेखील आहे. यामध्ये 5.6 किलोग्रॅम हायड्रोजनची क्षमता आहे. याचाच अर्थ ही कार 600 किमी अंतराचा पल्ला गाठू शकते. मात्र, ही कार 1000 किमी अंतरापेक्षाही अधिक अंतर कापू शकते. या कारमुळे प्रदूषण होत नाही. यामध्ये टेलटाइप उत्सर्जन आहेत.
कोणती कार चांगली? इलेक्ट्रीक की हायड्रोजन?
हायड्रोजन कार अधिक चांगली असल्याचे म्हटले जाते. एक इलेक्ट्रीक कार चार्ज करण्याच्या तुलनेत हायड्रोजन भरण्यासाठी फार कमी वेळ लागतो. विशेष म्हणजे हायड्रोजन कारही इलेक्ट्रीक कारपेक्षा अधिक अंतरापर्यंत प्रवास करू शकते. त्याशिवाय इलेक्ट्रीक वाहनांना चार्ज करण्यासाठी वीज उत्पादन करण्यासाठी कार्बन उत्सर्जन होते. तर हायड्रोजन फ्यूल कार चालवण्यासाठी आणि त्याचे उत्पादन करण्यासाठी कार्बन उत्सर्जन शून्य होते.