एक्स्प्लोर

Diwali 2022: दिवाळीआधी टीव्हीएस करणार धमाका, नवीन अपडेटसह येत आहे TVS Raider 125

TVS launching updated Raider 125: दिवाळीत तुम्ही ही जर नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS दिवाळीआधी आपली नवीन बाईक भारतात लॉन्च करणार आहे.

TVS launching updated Raider 125: दिवाळीत तुम्ही ही जर नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS दिवाळीआधी आपली नवीन बाईक भारतात लॉन्च करणार आहे. कंपनी आपली अपडेटेड Raider 125 बाईक 19 ऑक्टोबर रोजी नवीन अवतारात लॉन्च करणार आहे. कंपनीने मागील वर्षी ही बाईक लॉन्च केली होती. आता हीच बाईक अपडेट करण्यात आली आहे. यावेळी कंपनी Raider ला वेगळ्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च करेल ज्याला TVS Motorways म्हटले जात आहे. 

TVS नवीन Raider 125 MotoWars वर व्हर्च्युअल पद्धतीने लॉन्च करणार आहे. जे स्मार्ट डिव्हाइसेसवर लाइव्ह स्ट्रीम केले जाईल. 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता याचे प्रसारण सुरू होईल. कंपनीने बाईकचा टीझरही जारी केला आहे. ज्यामध्ये नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दाखवण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने बाईकमध्ये असलेल्या कनेक्टिव्हिटी फीचर्सची झलकही दाखवली आहे.

या बाईकमध्ये काय असेल नवीन? 

टीझर पाहता असा अंदाज बांधला जात आहे की, कंपनी नवीन कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि अपडेटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह नवीन Raider 125 लॉन्च करणार आहे. अपडेटेड Raider 125 नवीन प्रकारात लॉन्च केला जाऊ शकतो, जो बाजारात उपलब्ध असलेल्या Raider पेक्षा थोडा अधिक महाग असेल. नवीन मॉडेल कंपनीच्या SmartConnect कनेक्टिव्हिटी फीचरने (TVS SmartXonnect) सुसज्ज असेल. नवीन Raider ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे सपोर्ट असेल. यासोबतच या बाईकमध्ये कॉल आणि एसएमएस अलर्टसह कॅलेंडर देखील अॅक्सेस करता येणार आहे. कंपनी TVS SmartConnect सह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देखील देते. या बाईकमध्ये पूर्वीपेक्षा मोठा कलर टीएफटी डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

इंजिन 

नवीन Raider 125 चे डिझाइन आणि लूक जुन्या मॉडेल सारखेच असू शकते. यासोबतच कंपनी इंजिनमध्येही बदल करणार नाही, अशी शक्यता आहे. सध्या बाजारात उपलब्ध TVS Raider मध्ये 124.8 cc, 4-स्ट्रोक, इंधन इंजेक्टेड, सिंगल सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 7500 rpm वर 8.37 bhp ची पॉवर आणि 6000 rpm वर 11.2 Nm टॉर्क जनरेट करते.

TVS Raider 125 ला पुढील आणि मागील बाजूस 17-इंच ट्यूबलेस टायर देण्यात आले आहे.  यात समोर 240 mm डिस्क ब्रेक आणि 130 mm ड्रम ब्रेकचा पर्याय देण्यात आला आहे. तर मागील बाजूस फक्त ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. बाईकचे वजन 123 किलो आहे आणि यात 10 लिटरची इंधन टाकी आहे. Raider 125 चार रंगांमध्ये उपलब्ध आहे - फायरी यलो, स्ट्राइकिंग रेड, ब्लेझिंग ब्लू आणि विक्ड ब्लॅक.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget