Rolls-Royce : 'ब्लॅक बॅज घोस्ट रोल्स-रॉयल्स' भारतात झाली लाँच; किंमत आणि फिचर्स माहितीये?
'ब्लॅक' थीमवर आधारित असणाऱ्या या कारची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात...
Rolls-Royce : नुकतीच 'ब्लॅक बॅज घोस्ट: रोल्स-रॉयल्स' (Black Badge Ghost Rolls Royce) ही लग्झरी कार भारतामध्ये लाँच झाली आहे. जगातील सर्वांत महागड्या कार्सच्या यादीमध्ये या कारचा समावेश होते. या सेडान कारमध्ये अनेक फिचर्स आहे. तसेच ही कार घोस्ट लग्झरी सेडानचे लेटेस्ट व्हर्जन आहे. 'ब्लॅक' थीमवर आधारित असणाऱ्या या कारची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात...
'घोस्ट ब्लॅक बॅज: रोल्स-रॉयल्स' या गाडीच्या 44,000 रंगामधील एक रंग ग्राहक निवडू शकतात. ही कार हँड पेंटेड आहे. जवळपास 45 किलो रंगांचा वापर या गाडीला रंग देण्यासाठी केला जातो. या कारला रंग देण्यासाठी पाच तास लागतात. या गाडीचे चाक 21 इंची एलॉय व्हील्स आहेत. कारचा टॉप स्पीड 250km/h आहे. गाडीमध्ये एक्सल स्टीयरिंग देखील आहे. कारचा टॉप स्पीड 250km/h आहे. रोल्स रॉयल्स ब्लॅक बॅज घोस्टला सिग्नेचर हाय-ग्लॉसी ब्लॅक पियानो फिनिश देण्यात आले आहे.
तसेच या गाडीमध्ये 6.75 लिटरचे V12 इंजन आहे जे 600 PS पॉवर आणि 900 एनएम टॉर्क जनरेट करू शकते. ये स्टँडर्ड कारपेक्षा जवळपास 29hp आणि 50Nm जास्त आहे. कारमध्ये ZF 8-स्पीड गिएरबॉक्स देखील आहे. या कारमध्ये लो ड्रायव्हिंग मोड देखील आहे. या कारची किंमत 13 कोटी रूपये आहे. त्यामुळेच या कारचा सामावेश महागड्या कार्सच्या यादीत होतो.
महत्वाच्या बातम्या :
- Car : Kia EV6 Electric Car लवकरच भारतात होणार लॉन्च; 'या' दिवसापासून सुरु होईल प्री-बुकिंग
- Hyundai Ioniq 5 : ह्युंदाईची यूनिक 5 इलेकट्रिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
- Review: मारुतीने लॉन्च केली अपडेटेड 'एर्टिगा', जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या काय आहे नवीन
- Maruti XL6 : नवीन इंजिन, प्रीमिअम लूकसह वाचा Maruti XL6 चा संपूर्ण रिव्ह्यू