एक्स्प्लोर

Review: मारुतीने लॉन्च केली अपडेटेड 'एर्टिगा', जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या काय आहे नवीन

New Ertiga Vs Old Ertiga Eeight: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन Ertiga अपडेट करत भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.

New Ertiga Vs Old Ertiga Eeight: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली नवीन Ertiga अपडेट करत भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या नवीन एमपीव्हीमध्ये कंपनीने आधीच्या मॉडेलच्या तुलनेत उत्तम डिझाइन, फीचर्स आणि नवीन जनरेशन के-सिरीज इंजिन दिले आहे. जुन्या Ertiga च्या तुलनेत, नवीन कार शक्तिशाली आणि अधिक मायलेज देणारी आहे. नवीन 2022 Maruti Ertiga ची किंमत 8.35 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.79 लाख रुपयांपर्यंत जाते. ही याची एक्स शोरूम किंमत आहे. याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 10.99 लाख ते 12.79 लाख रुपयांदरम्यान आहे. तर CNG मॉडेलची किंमत 10.44 लाख ते 11.54 लाख रुपयांदरम्यान आहे. नवीन एर्टिगा याच्या जुन्या मॉडेलपेक्षा किती वेगळी आहे, तसेच यात कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. 

New-Gen K-Series Engine 

सर्वात मोठे अपडेट नेक्स्ट-जनरेशन 1.5L पेट्रोल इंजिनच्या रूपात या कारमध्ये देण्यात आले आहे. हे इंजिन आरामदायी डायव्हिंगसाठी सर्वात उत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नवीन ड्युअलजेट गॅसोलीन युनिटमध्ये प्रति दोन इंजेक्टर आहेत. जे इंधन इंजेक्शनवर अधिक नियंत्रण देते. यात स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञान देखील मिळते. जे याची इंधन कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते. नवीन पेट्रोल इंजिन 6,000rpm वर 103bhp पॉवर आणि 4,400rpm वर 136.8Nm टॉर्क जनरेट करते.

CNG मोड

नवीन मारुती एर्टिगा 2022 मध्ये 1.5-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह फॅक्टरी फिट सीएनजी किट देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. MPV पेट्रोल मोडवर धावत असताना 136 Nm टॉर्कसह 100 Bhp पॉवर आणि CNG मोडवर धावत असताना 121.5 Nm सह 87 Bhp पॉवर जनरेट करते.

New Automatic Gearbox

नवीन Ertiga चे सर्व प्रकार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतात. जुन्या 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनला नवीन 6-स्पीड ऑटोमॅटिक युनिटने बदलण्यात आले आहे. जे पॅडल शिफ्टर्ससह येते.

High On Mileage

जुन्या मॉडेलच्या तुलनेत, नवीन 2022 मारुती एर्टिगा जास्त मायलेज देते. याच्या मॅन्युअल प्रकारात 20.51kmpl, तर ऑटोमॅटिक मॉडेल 20.30kmpl मायलेज देत असल्याचा दावा केला जात आहे. नवीन मारुती एर्टिगा सीएनजी 26.11kmpl मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. 

Minor Design Changes & Color 

या नवीन MPV मध्ये किरकोळ कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहे. हे अपडेटेड मॉडेलला 'विंग्ड' क्रोम ट्रिमसह पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हील आणि क्रोम गार्निशसह टेलगेट मिळते. यात दोन नवीन रंग पर्याय देण्यात आले आहे. ज्यात डिग्निटी ब्राउन आणि स्प्लिंडिड सिल्व्हरचा समावेश आहे. 

More Safety Features

मारुती सुझुकीने नवीन एर्टिगा 4 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) ने सुसज्ज केली आहे. स्टँडर्ड सेफ्टी किटमध्ये मागील पार्किंग सेन्सर्स, EBD आणि ब्रेक असिस्टसह ABS, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, स्पीड अलर्ट सिस्टम, दुसऱ्या रांगेत ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज आणि ड्रायव्हर आणि सह-ड्रायव्हर सीटबेल्ट रिमाइंडर्स सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident: नाशिकच्या भीषण अपघातात पुण्याच्या आयटी कंपनीतील एकटा विक्रांत कसा वाचला? आक्रित घडण्यापूर्वी मृत्यू समोर दिसला
नाशिकच्या भीषण अपघातापूर्वी विक्रांतला मृत्यू समोर दिसला, पण मित्रांनी ऐकलं नाही, नेमकं काय घडलं?
Embed widget