Hyundai Ioniq 5 : ह्युंदाईची यूनिक 5 इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
ह्युंदाई या वर्षी आपली यूनिक 5 ( Hyundai Ioniq 5) ही इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. 2022 च्या जुलैनंतर ह्युंदाई आपली ही यूनिक 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही (SUV) बाजारात आणण्याची शक्यता आहे.
Hyundai : वाहन निर्मितीमधील अग्रेसर असलेली ह्युंदाई या वर्षी आपली यूनिक 5 ( Hyundai Ioniq 5) ही इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. 2022 च्या जुलैनंतर ह्युंदाई आपली ही यूनिक 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही (SUV) बाजारात आणण्याची शक्यता आहे.
Hyundai Ioniq 5 इलेक्ट्रिक कार नवीन E-GMP प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यामुळे इतर पेट्रोल/डिझेल कारशी त्याचा काहीही संबंध नाही. इतर कारपेक्षा ही एक मोठी एसयूव्ही आहे. यात डीआरएलसह पिक्सेलेटेड हेडलॅम्प आहेत. यूनिक 5 मध्ये फ्लश डोअर हँडल आणि 20-इंच मोठी चाके देखील मिळतात.
ह्युंदाईच्या इतर गाड्यांपेक्षा यूनिक पाच ही कार वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. त्यामुळे या कारच्या आतील भाग देखील अप्रतिम आहे. या कारला अधिक प्लेन फ्लोअर देण्यात आला आहे. शिवाय तिचा व्हीलबेस 3,000 मिमी इतका मोठा आहे. कारचा सेंटर कन्सोल देखील पुढे आणि मागे सरकतो. कारच्या आतील बहुतेक भाग पीईटी बाटल्या, वनस्पती आधारित धागे, नैसर्गिक लोकरीचे धागे आणि इको-प्रोसेस्ड लेदर यांसारख्या पर्यावरणास अनुकूल असलेल्या वस्तूंपासून बनविण्यात आले आहेत.
यूनिक पाच ही केवळ AWD किंवा फक्त रियर मोटर मोडसह 58 kWh किंवा 72.6 kWh बॅटरी पॅकसह येईल. रियर मोटर मोडमध्ये 500 किमी पर्यंत रेंज देऊ शकते. Ioniq 5 मध्ये नेहमीच्या वेगवान AC/DC चार्जरसह एका वाहनातून दुसरे वाहन चार्जिंग करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी हेड-अप डिस्प्ले मिळवणारी ही पहिली ह्युंदाई कार आहे. Ioniq 5 हे प्रीमियम उत्पादन असेल आणि त्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये असेल.
महत्वाच्या बातम्या