(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Auto Expo 2023: MG ने Euniq 7 केली सादर, 'या' तंत्रज्ञानाने कार आहे सुसज्ज
G Euniq 7 Unveiled: एमजी मोटरने (MG Motor) ऑटो एक्स्पो 2023 च्या दुसऱ्या दिवशी इंधन सेल बिझनेस क्लास MPV MG Unique 7 चे अनावरण केले आहे.
MG Euniq 7 Unveiled: एमजी मोटरने (MG Motor) ऑटो एक्स्पो 2023 च्या दुसऱ्या दिवशी इंधन सेल बिझनेस क्लास MPV MG Unique 7 चे अनावरण केले आहे. ही एमपीव्ही आधुनिक बिझनेस क्लास फीचर्सने सुसज्ज आहे. कंपनीने ही कार ऑटोनॉमस आणि अॅडव्हान्स्ड ड्राइव्ह असिस्टन्स फीचर (ADAS) सह सादर केली आहे. MG Euniq 7 मध्ये 6.4 किलो उच्च दाबाचा हायड्रोजन सिलेंडर बसवण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, याचा सिलेंडर स्पेस ग्रेड मटेरियलपासून बनवला आहे. जो 824 डिग्री पर्यंत तापमान सहन करू शकतो.
एमजी मोटर्स इंडियाचे एमडी राजीव चाबा यांनी सांगितले की, ही एमपीव्ही हायड्रोजनच्या फुल टाकीवर 605 किमीची रेंज देऊ शकते. ही एमपीव्ही जलद रिफिलिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. याची इंधन टाकी अवघ्या 3 मिनिटांत भारत येते. MG Euniq 7 MPV चे इंजिन हायड्रो केमिकल रिअॅक्शनच्या मदतीने पॉवर निर्माण करते. तसेच त्यातून केवळ पाणी उत्सर्जन म्हणून बाहेर येते. येत्या काळात ही कार भारतात लॉन्च केली जाऊ शकते.
याशिवाय, MG Motor India ने ऑटो एक्स्पो 2023 ला धमाकेदार सुरुवात करताना त्यांच्या नवीन MG हेक्टर फेसलिफ्टच्या किमती जाहीर केल्या आहेत. यासह कंपनीने आपली आगामी इलेक्ट्रिक कार MG 4 (MG4) आणि इलेक्ट्रिक SUV MG EHS (MG EHS) तसेच MG 6 सेडानचे (MG6) अनावरण केले आहे. ऑटो एक्स्पो 2023 मधील MG च्या पॅव्हेलियनचे नाव MG Drive Ahead India vision आहे आणि त्यात 14 कारचे प्रदर्शन केले जात आहे.
MG Euniq 7 Unveiled: नवीन हेक्टर 2023 लॉन्च
नवीन Hector 2023 MG ने ऑटो एक्स्पो दरम्यान लॉन्च केले होते. कंपनीने पाच, सहा आणि सात सीट्सचा पर्याय असलेली नवी एसयूव्ही बाजारात आणली आहे. एसयूव्ही एकूण पाच व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्यामध्ये स्टाइल, स्मार्ट, स्मार्ट प्रो, शार्प प्रो आणि सेव्ही प्रो यांचा समावेश आहे. MG मोटर्स इंडियाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता यांनी सांगितले की, नवीन हेक्टर 2023 ची एक्स-शोरूम किंमत 14.72 लाख रुपयांपासून सुरू होते. याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 22.42 लाख रुपये आहे.