लाडकी Ambassador नवीन अवतारात परतणार? कंपनी इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत
Ambassador Electric Car: भारतात एक काळ असा होता जेव्हा कार म्हटलं की, डोळ्यसमोर फक्त एकच चित्र उभं राहायचं, ते म्हणजे अॅम्बेसिडर कारचं.
Ambassador Electric Car: भारतात एक काळ असा होता जेव्हा कार म्हटलं की, डोळ्यसमोर फक्त एकच चित्र उभं राहायचं, ते म्हणजे अॅम्बेसिडर कारचं. अॅम्बेसेडर ही भारताची क्लासिक कार म्हणून ओळखली जाते. अॅम्बेसेडर ही भारतात बनलेल्या पहिल्या कारपैकी एक होती. तुम्हीही अॅम्बेसिडरचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या कारची निर्माता हिंदुस्थान मोटर्स आपले इलेक्ट्रिक वाहन भारतात आणण्याच्या तयारीत आहे. बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार, हिंदुस्थान मोटर्स इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे.
Hindustan Motors बनवणार इलेक्ट्रिक कार
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, भारतीय वाहन उद्योग या क्षेत्रात पुढे जात आहे. अशा परिस्थितीत बहुतेक कंपन्या त्यांचे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहेत आणि काही त्याची तयारी करत आहेत. आता या यादीत हिंदुस्थान मोटर्सच्या नावाचाही समावेश झाला आहे. हिंदुस्थान मोटर्सला युरोपियन कंपनीशी हातमिळवणी करून आपला व्यवसाय वाढवायचा आहे, असे अहवालात म्हटले आहे. कंपनीने युरोपियन ईव्ही निर्मात्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. कंपनी आगामी काळात मोठी घोषणा करू शकते, असे बोलले जात आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर हे कंपनीचे पहिले उत्पादन असेल
सध्या दोघेही मेकर इक्विटी स्ट्रक्चरवर काम करत आहेत. सध्याच्या प्रस्तावानुसार, हिंदुस्थान मोटर्सचा भागीदारीमध्ये 51% हिस्सा असेल आणि युरोपियन ब्रँडचा 49% हिस्सा असेल. या भागीदारीअंतर्गत केवळ इलेक्ट्रिक कारच नाही, तर इलेक्ट्रिक टू-व्हीलरवरही लक्ष केंद्रित केले जाईल. कंपनी पहिले उत्पादन म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे.
दरम्यान, Ambassador ही देशातील पहिली कार होती आणि ती 1942 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. 1980 पर्यंत त्याचा बाजारातील हिस्सा 75 टक्के होता, परंतु 1983 मध्ये मारुतीच्या आगमनानंतर त्याचा व्यवसाय कमी होऊ लागला. यानंतर, 1991 मध्ये, अॅम्बेसेडरचा बाजारातील हिस्सा केवळ 20 टक्के इतका कमी झाला. हळूहळू परिस्थिती अशी झाली की कंपनीचा उत्तरपारा प्लांट 2014 मध्ये बंद झाला. 2017 मध्ये, हा ब्रँड Peugeot SA ने फक्त 80 कोटी रुपयांना विकत घेतला होता.