एक्स्प्लोर

2022 Hyundai Venue Facelift review; अधिक आकर्षक आणि दमदार, अशी आहे नवीन ह्युंदाई व्हेन्यू

Hyundai Venue Facelift review: Hyundai ने नुकतीच भारतात आपली नवीन Hyundai Venue फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. आपण याच कारची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

Hyundai Venue Facelift review: Hyundai ने नुकतीच भारतात आपली नवीन Hyundai Venue फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. पहिल्यांदा Hyundai Venue भारतात मे 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. हा तो काळ होता जेव्हा कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक होती. तेव्हापासून कॉम्पॅक्ट SUV मार्केट झेप घेत वाढले आहे आणि Hyundai Venue ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Hyundai कारपैकी एक बनली आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक कॉम्पॅक्ट एसयूव्ही विक्रीसाठी असल्या तरी Hyundai Venue ने आपली पकड कायम ठेवली. अशातच कंपनीने आपली अपडेटेड आणि अधिक नवीन फीचर्सने सुसज्ज असलेली 2022 Hyundai Venue Facelift बाजारात उतरवली आहे. आपण याच कारची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

नवीन Hyundai Venue ला कंपनीने 7.53 लाख ते 12.47 लाख (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च केले आहे. यात नवीन डिझाइन, स्टाइलिंग आणि अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार पाहताच ग्राहकांना यात अनेक नवीन बदल दिसतील. आपल्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत ही कार खूपच वेगळी आणि दमदार आहे. अपडेटेड Hyundai Venue मध्ये फ्रंट फॅशिया आणि नवीन ग्रिल देण्यात आली आहे. याला 'पॅरामेट्रिक ज्वेल ग्रिल' देखील म्हटले जाते. जी दिसायला खूपच आकर्षक आहे. या ग्रिलला डार्क क्रोम इन्सर्ट देण्यात आले आहे. जे दिसायला खूपच फॅन्सी दिसते.

यात अजूनही स्प्लिट हेडलॅम्प फीचर्स पाहायला मिळते, मात्र यात काही बदल देखील आहेत. स्प्लिट हेडलॅम्पचा वरचा भाग आता जाड आणि लांब झाल्याचं दिसते. स्प्लिट हेडलॅम्पचा खालचा भागही थोडा रिफ्रेश करण्यात आला आहे. डिझाइन सेम असले तरी क्रोम सराउंड एलईडी डीआरएलने बदलले आहे. यामध्ये अनुक्रमे लो आणि हाय बीम हाताळण्यासाठी एलईडी प्रोजेक्टर आणि रिफ्लेक्टर हेडलॅम्प देखील मिळतात. बंपर देखील नव्याने डिझाइन करण्यात आला असून त्याच्या आडव्या रेषा आणि सिल्व्हर स्किड प्लेटसह अगदी सरळ ठेवले आहे. जुन्या टर्बाइन-स्टाईल डायमंड-कट अॅलॉय व्हील आता प्रीमियम मल्टी-स्पोक अॅलॉय व्हील्सने बदलले आहेत. हे कारचे एकूण डिझाइन आणि स्टाइलिंग वाढवतात. याच्या मागील बाजूस नवीन Hyundai Venue ला कनेक्टेड टेल लॅम्प्स मिळतात. जे या कारला अधिक प्रीमियम बनवते. याच्या टॉपवर एक शार्क फिन अँटेना देण्यात आला.

कॉकपिट आणि इंटिरियर 

यातील नवीन ड्युअल-टोन ब्लॅक आणि आयव्हरी थीममुळे आतील भाग छान दिसतो. याच्या नवीन ड्युअल-टोन थीमने जुन्या सिंगल-टोन ग्रे थीमची जागा घेतली आहे. याच्या केबिन लेआउटच्या बाबतीत फारसा बदल झालेला नाही. ड्रायव्हरच्या पुढील भागाला माउंटेड कंट्रोल्ससह प्रीमियम 4-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळते. स्टीयरिंग व्हीलच्या मागे पूर्ण-रंगीत TFT MID असलेला डिजिटल क्लस्टर आहे, जो ड्रायव्हरला वापरण्यासाठी बरीच माहिती प्रदर्शित करतो. तसेच 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम डॅशबोर्डच्या मध्यभागी आहे. यात वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो फीचर्स आहेत. यात स्मार्टफोनला इन्फोटेनमेंट सिस्टमशी कनेक्ट करणे खूप सोपे आहे. याशिवाय नवीन 2022 Hyundai Venue मध्ये जुन्या मॉडेलमधून अनेक फीचर्स घेण्यात आले आहेत. यात automatic climate control, सिंगल-पॅन सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग आणि बरेच काही मिळते. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॉवर ड्रायव्हरची सीट. हे फीचर अधिक चांगले. पॉवर्ड सीट नियंत्रित करण्यासाठी बटणे बाजूला आहेत आणि ते ऑपरेट करण्यासाठी थोडी अडचण जाणवते. नवीन Hyundai Venue ला ऑटोमॅटिक एअर प्युरिफायर, अॅम्बियंट लाइटिंग देखील मिळते. फीचर्सच्या बाबतीत कारला अलेक्सा आणि Google Assistant उपकरणाचा सपोर्ट मिळतो. आता तुम्ही तुमच्या Hyundai Venue ला कमांड देऊ शकता. Hyundai ने BlueLink सॉफ्टवेअर देखील अपडेट केले आहे. या कारमध्ये तुम्हाला 60 हून अधिक कनेक्ट फीचर्स मिळतील.

ह्युंदाई नेहमीच आरामदायक कार बनवण्यासाठी ओळखली जाते. Hyundai Venue आकाराने तुलनेने लहान असूनही, भारतातील Hyundai मधील सर्वात Comfortable कार आहे. सीट्स अतिशय आरामदायक आहेत आणि पॉवर सीट ड्रायव्हरसाठी या कारमधील बरेच फीचर्स आरामात हाताळता येतात. मागील सीटला फर्स्ट-इन-सेगमेंट 2-स्टेप रिक्लाइन फीचर मिळते. याच्या सिट्समध्ये भरपूर हेडरूम, लेग रूम आणि नी रूम आहे.

इंजिन 

यात इंजिन पर्यायांच्या बाबतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. एंट्री लेव्हल 1.2 पेट्रोलसह सादर करण्यात आली आहे. यात 1.0l टर्बो पेट्रोल आणि 1.5l डिझेल देण्यात आले. आम्ही 120ps/172Nm सह 1.0L टर्बो पेट्रोल कार चालवली आणि याचे इंजिन सर्वोत्तम आहे. असं असलं तरी हे इंजिन कार चालवताना थोडे आवाज करते. यात नवीन पॅडल शिफ्टर्स वापरणे आणखी सोपे होते. IMT गिअरबॉक्स हा एक जबरदस्त ट्रान्समिशन पर्याय आहे. जर तुम्ही बर्याच काळापासून मॅन्युअल गिअरबॉक्सवर कार ड्राईव्ह करत असाल, तर तुम्हाला IMT ची सवय होण्यासाठी थोडा वेळ लागेल. सुरळीत राइड देण्यासाठी नवीन Hyundai Venue चे सस्पेंशन बदलण्यात आले आहे. नवीन सस्पेंशन सेटअपमुळे बॉडी रोल नियंत्रित करण्यातही मदत होते. हा सस्पेन्शन सेटअप खरोखरच जबरदस्त आहे.

आम्हाला काय आवडते: नवीन स्टाइलिंग आणि फीचर्स, टर्बो पेट्रोल परफॉर्मन्स, राइड आणि handling, value for money, interior quality.
आम्हाला काय आवडले नाही: यात Diesel Automatic चा पर्याय नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget