एक्स्प्लोर

अॅट्रॉसिटी प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता; कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटळला

अॅट्रॉसिटी प्रकरणात कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे. कारण, औरंगाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

औरंगाबाद : अॅट्रॉसिटी प्रकरणात कन्नडचे माजी आमदार आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. एका पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. औरंगाबादेतील क्रांती चौक पोलीस ठाण्यात जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता आहे. कारण, औरंगाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अभिनंदन पाटणंगणकर यांनी हर्षवर्धन जाधव यांचा अर्ज फेटाळला आहे. प्रकरणात पानटपरी चालक नितीन रतन दाभाडे(30, रा. बनेवाडी)यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, दाभाडे यांनी जिल्हा न्यायासमोरील सिग्नल जवळ पानटपरी सुरु केली व तेथे निळा झेंडा लावला. 29 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हर्षवर्धन जाधव तेथे आले. त्यांनी ज्या जागी टपरी व निळा झेंडा लावला ती जागा माझ्या मालकीची आहे. त्यामुळे टपरी व झेंडा हटव असे दाभाडे यांना सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला व जाधव यांनी दाभाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन टपरी व झेंडा हटवला नाही तर, जीवे मारीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकारानंतर रविवारी रात्री दाभाडे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे गाठत दिलेल्या तक्रारीवरुन हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजनांचा मनसेमध्ये प्रवेश हर्षवर्धन जाधव यांना अटक होण्याची शक्यता गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी जाधव यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता, सहाय्यक लोकाभियोक्ता अजीत अंकुश यांनी गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत असुन आरोपीला जामीन दिल्यास तो फीर्यादीवर दबाव आणु शकतो. त्यामुळे अरोपीला जामीन देण्यात येवु नये अशी विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल MNS 14th Foundation Day | 'शॅडो कॅबिनेट' सरकारचे वाभाडे काढणार; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण

महत्त्वाच्या बातम्या

किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
किलोला 500 रुपये मिळवून देणारा हुरडा यंदा करपला! संभाजीनगरच्या 2 गावातल्या 14 कोटींच्या उलाढालीवर दुष्काळ संकट
पदवीधर निवडणूकीवरून महायुतीत बेबनाव! शिंदेसेनेनं सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला; संजय शिरसाट स्पष्टच म्हणाले...
पदवीधर निवडणूकीवरून महायुतीत बेबनाव! शिंदेसेनेनं सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला; संजय शिरसाट स्पष्टच म्हणाले...
Amravati : महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget