एक्स्प्लोर

माजी आमदार हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजनांचा मनसेमध्ये प्रवेश

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी मनसेमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला आहे. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंवर सडकून टीका केली.

मुंबई : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला आहे. कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार टीका केली. आता खैरे आयुष्यात कधीच खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी केलं आहे. हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासोबत नांदेड शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कौटगे आणि माजी शहरप्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

एका नव्या डॅशिंग भूमिकेत हर्षवर्धन जाधव दिसेल. गेल्या काही वर्षांमध्ये मी थोडा भटकलो होतो, काही गैरसमज झाले होते, त्यातून आता माझी घरवापसी झाली आहे. राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी नाही. या हिंदुत्वाचा पुरस्कार झाला पाहिजे. शिवसेना खऱ्या हिंदुत्वपासून दूर जात आहे, त्यामुळे अनेक शिवसैनिक मनसेमध्ये येतील. रावसाहेब दानवेचा जावई मनसेमध्ये गेला म्हणजे आता मनसे आणि भाजप एकत्र येईल, असं कुणी समजू नये, असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे कधीच आयुष्यात खासदार होणार नाही, हे मी लिहून देतो. मी त्यांना आधी सुद्धा बोललो, आता तुमचं वय झालंय तुम्ही निवृत्ती घ्यावी. शिवसेनेचं नेतेपद मिळेल त्यावर खूश राहावं. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाबाबत घाणेरडी वक्तव्य करणे सोडावं. त्यात त्यांची पातळी दिसते, असंही हर्षवर्धन जाधवांनी म्हटलं.

राज ठाकरे ज्या पक्षासोबत जातील त्यासोबत आम्ही आहोत- प्रकाश महाजन

राज ठाकरे यांच्यासोबत काम करावं, अशी इच्छा होती, मात्र मधील 10 वर्षाचा गॅप गेला. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्यानुसार त्यांना पाठिंबा द्यावा यासाठी मी पुन्हा राज ठाकरे सोबत आलो आहे. राज ठाकरे ज्या पक्षासोबत जातील त्यासोबत आम्ही आहोत. कारण जे राजकारण बदलत आहे, त्यात राज ठाकरेंसोबत जावं वाटलं. खूप दीर्घ काळापासून दूर होतो याची मला खंत आहे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

TCS Manager Manav Sharma : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Video : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Ranji Trophy 2024-25: विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
Raksha Khadse : मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
Ramdas Athawale on Dhananjay Munde : वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 02 March 2025Anandache Paan | 'मु. पो. १० फुलराणी' पुस्तकाबद्दल खास गप्पा! कोंडाबाई पारधे यांचा प्रेरणादायी प्रवास!ABP Majha Headlines : 02 PM : 02 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 March 2025 : ABP Majha : Maharashtra News :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TCS Manager Manav Sharma : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Video : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Ranji Trophy 2024-25: विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
विदर्भाने 7 वर्षांनी जिंकली रणजी ट्रॉफी! एकही सामना न गमावता बनले 'चॅम्पियन', ट्रॉफीवर तिसऱ्यांदा कोरले नाव
Raksha Khadse : मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
मुलीच्या छेडछाड प्रकरणी रक्षा खडसे आक्रमक, पोलिसांची धावाधाव, एक जण ताब्यात
Ramdas Athawale on Dhananjay Munde : वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
वाल्मिक कराड धनजंय मुंडेंच्या जवळचा, राजीनामा द्यावा; केंद्रीय मंत्री आठवलेंचं करुणा शर्मांच्या पोस्टवरही भाष्य
हीच खरी श्रद्धांजली... वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन लेकाने दिला दहावीच्या इंग्रजीचा पेपर
हीच खरी श्रद्धांजली... वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी देऊन लेकाने दिला दहावीच्या इंग्रजीचा पेपर
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
धावत्या ट्रकचा भीषण अपघात; वाहनाचं तोंड वरती, डंपर पलटी, सुदैवाने दुर्घटना टळली
Virat Kohli and Rohit Sharma : कोहली आज मैदानात उतरताच 'विराट' इतिहास रचणार! कॅप्टन रोहित सुद्धा स्पेशल रेकॉर्ड करणार
कोहली आज मैदानात उतरताच 'विराट' इतिहास रचणार! कॅप्टन रोहित सुद्धा स्पेशल रेकॉर्ड करणार
Mumbai Crime: पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह मुंबई विमानतळावर अटक
पोटात लपवून आणले तब्बल 11 कोटींचे कोकेन, ब्राझीलवरून आलेले विदेशी महिलेला 100 कॅप्सूलसह अटक
Embed widget