एक्स्प्लोर

हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान 16 ऑक्टोबरला हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. जाधव यांच्या समर्थनगर भागातील घरावर मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी हर्षवर्धन जाधव यांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि घरावर दगडफेक केली.

औरंगाबाद निवडणूक प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेलं वक्तव्य आता त्यांना चांगलंच भोवण्याच्या  मार्गावर आहे. कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहिता प्रमुखांना तक्रार दिली असून हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात कन्नड पोलीस ठाण्यांमध्ये आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आदर्श आचारसंहिता पथक प्रमुख राममहेंद्र डोंगरदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भादवि कलम 188 प्रमाणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी प्रचार सभेदरम्यान उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह शब्द वापरले होते. तेव्हापासून त्यांनी शिवसैनिकांची नाराजी ओढावून घेतली. या प्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरुद्घ शिवसेनेकडून तक्रार दाखल करण्यात आलीय. औरंगाबादेतल्या पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नगसेवक राज वैद्य यांनी ही तक्रार केलीय. शिवीगाळ, शिवसैनिकांच्या भावना दुखावणं, जातीय भावना भडकावल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान  16 ऑक्टोबरला हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केला. जाधव यांच्या समर्थनगर भागातील घरावर मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी हर्षवर्धन जाधव यांच्या गाड्यांची तोडफोड केली आणि घरावर दगडफेक केली. हल्ला झाला त्यावेळी हर्षवर्धन जाधव घरी नव्हते. प्रचारासाठी ते कन्नडमध्ये आहेत. मध्यरात्री तीन ते चार तरुण बाईकवरुन आले आणि त्यांनी गेटबाहेरुन दगडफेक केली. या घटनेत जाधव यांच्या दोन गाड्यांचं नुकसान झालं आहे. VIDEO | हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला, मध्यरात्री गाड्यांचीही तोडफोड | ABP Majha शिवसैनिक धडा शिकवणारच : अंबादास दानवे घरावरील हल्ल्याप्रकरणी अंबादास दानवे म्हणाले की, "हर्षवर्धन जाधवांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी माझ्या कानावर आली. जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये निश्चितच रोष आहे. पण शिवसैनिक असा भ्याड हल्ला करणार नाही. निवडणूक होईपर्यंत संयम बाळगा, असं आम्ही शिवसैनिकांना सांगितलं आहे. स्टंटबाजी करुन सहानुभूती मिळवण्याची सवय हर्षवर्धन जाधवांना झाली आहे. पण शिवसैनिक त्यांना धडा शिकवणार आहेत हे मात्र नक्की." शिवसैनिकांनीच हल्ला केला : हर्षवर्धन जाधव माझ्या घरावर शिवसैनिकांनी हल्ला केला. मला हा हल्ला नामर्दासारखा वाटतो. हल्ला झाला त्यावेळी माझी पत्नी आणि मुलगा असे दोघेच घरात होते. ही निषेधार्ह बाब आहे. मधल्या काळात शिवसेनेने माझ्यावर घाणेरडे आरोप केले होते. इतकंच काय तर हर्षवर्धन जाधवांनी स्वत:च्या वडिलांचा खून केला, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. परंतु मी संयम बाळगला. परंतु वारंवार आरोप केल्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दलच वक्तव्य केलं. Assembly Election 2019 | शिवसैनिकांकडून घरावर हल्ला : हर्षवर्धन जाधव | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!

व्हिडीओ

Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Sugercane : साखर हंगामासाठी घाई का? Special Report
How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rakesh Mehta: दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
दिल्लीच्या माजी मुख्य सचिवांकडून आयुष्याचा शेवट; नोएडातील घरात मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या विरोधात भाजप प्रवक्त्त्याचा मानहानीचा खटला दाखल; 2 कोटींच्या भरपाईची मागणी
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
Embed widget