एक्स्प्लोर

Chandrakant Khaire: औरंगाबादच्या शिवसेना भवनावर दावा करणाऱ्या आमदार शिरसाट यांना खैरेंचे प्रत्युत्तर; म्हणाले...

Chandrakant Khaire : पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत.

Chandrakant Khaire On Sanjay Shirsat: निवडणुक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिल्यावर पुन्हा एकदा शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Uddhav Thackeray) आमने-सामने आले आहेत. दरम्यान औरंगाबाद येथील शिवसेना भवनावर  (Shiv Sena Bhavan) शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दावा केला आहे. त्यांच्या याच दाव्याला आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'कोण शिरसाट आणि त्यांचा औरंगाबादच्या शिवसेना भवनासाठी त्यांचे काय योगदान आहे?' असा खोचक टोला खैरे यांनी लगावला आहे. 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या सर्वच गोष्टींवर शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. त्यातच आज सकाळी ‎विधिमंडळातील शिवसेना कार्यालयाचा देखील शिंदे गटाने ताबा घेतला आहे. दरम्यान, आता औरंगाबादमधील औरंगपुरा भागात उभारलेले शिवसेना‎ भवनदेखील आमचेच असून,‎ आगामी काळात ते ताब्यात घेणार‎ असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट‎ आणि शिंदे गटाचे‎ औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ‌ यांनी‎ केला होता. त्यांच्या याच दाव्याला खैरे यांनी उत्तर देत, शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. 

काय म्हणाले खैरे? 

यावेळी बोलताना खैरे म्हणाले की, कोण शिरसाट आणि कोण जंजाळ, त्यांचा काय संबध आहे. औरंगाबाद शिवसेना भवनात त्यांचं काय योगदान आहे? शिवसेनाप्रमुख यांनी जागा ती जागा पाहिली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला होता. त्याप्रमाणे आम्ही सर्व काही केले होते. त्यावेळी मात्र याच लोकांनी काड्या केल्या होत्या. शिवसेनामध्ये असताना देखील हे काम होऊ नयेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. आज खूप कष्टांनी आम्ही इमारत बनवून घेतली आहे. तसेच एकही पैसा महानगरपालिकेचा आम्ही बुडवला नाही. महापालिकेला यामुळे खूप मोठ्याप्रमाणावर उत्पन्न देखील झाले. तसेच, शिवाई सेवा ट्रस्टची ही जागा आहे. त्यांनी आम्हाला कितीही डिवचण्याची प्रयत्न केला तरीही, आम्हाला काही फरक पडत नसल्याचं खैरे म्हणाले आहेत. 

सर्व पक्षीय शासकीय कार्यालय ताब्यात घेणार 

दरम्यान, मुंबईतील शिवसेना भवन आम्ही ताब्यात घेणार नसून, त्यावर आम्ही दावा देखील करणार नसल्याचा खुलासा संजय शिरसाट यांनी केला आहे. मात्र शासकीय कार्यालयात असलेले शिवसेना पक्ष कार्यालय आम्ही ताब्यात घेणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटले आहे. सोबतच अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील व्हीप झारी केला जाणार असून, शिवसेनेच्या सर्वच आमदारांना तो लागू राहणार असल्याचं देखील शिरसाट म्हणाले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

Shiv Sena Bhavan: विधिमंडळातील कार्यालयासोबतच शिवसेना भवनावरही दावा; शिंदे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Embed widget