एक्स्प्लोर

विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अतीवृष्टीमुळे (heavy rain) झालेल्या नुकसानीत विमा कंपनीने (insurance company) 70 टक्के शेतकऱ्यांचे (Farmers) दावे फेटाळले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे (heavy rain) झालेल्या नुकसानीत विमा कंपनीने (insurance company) 70 टक्के शेतकऱ्यांचे (Farmers) दावे फेटाळले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. या नुकसानीत 680548 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना पूर्व सूचना दिल्या होत्या. त्यापैकी विमा कंपन्यांनी 229155 दावे स्वीकारले तर 451393 दावे फेटाळले आहेत. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. 

शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पंतप्रधान पीक विमा योजनेतर्गत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला जाब विचारला आहे. मात्र आज संध्याकाळपर्यंत उत्तर न आल्यास याबाबत कृषी अधिकरी थेट शासनाकडे विमा कंपनीची तक्रार करणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी पी. आर.देशमुख  यांनी दिली आहे. 

मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती?

हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 अतीवृष्टीमुळं झालेले मोठे नुकसान झाले होते. 154378 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना (दावे केले होते)  दिली होती. त्यापैकी 132418 दावे स्वीकारले (विमा परतावा दिला ) आहेत.  
21960 प्रकरणे प्रलंबित आहेत.  (विमा परतावा देणे बाकी आहे )

परभणी

खरीप हंगाम 2023

ऑगस्टमध्ये पावसाचा खंड होता. नोव्हेंबरमध्ये जास्त पाऊस झाला. या काळात 1 लाख 98 हजार तक्रारी विमा कंपनीकडे आल्या होत्या. यापैकी 1 लाख 2 हजार तक्रापी विमा कंपनीने स्वीकारल्या आहेत. पुन्हा आंदोलन केल्यानंतर 30 हजार तक्रारी स्वीकारल्या आहेत. 66000 अर्ज नाकारले आहेत.  

जालना 

ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2023 मध्ये जालना जिल्ह्यात अतीवृष्टीमुळं मोठँ नुकसान झालं होतं. यावेळी 610834  शेतकऱ्यांनी अर्ज  केले होते. त्यापैकी 97822 दावे स्वीकारले. 

लातूर 

ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 लातूर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं होतं. 121185  शेतकऱ्यांनी पूर्वसूचना(दावे केले होते)  दिली होती. त्यापैकी 11604 दावे स्वीकारले. तर 109581 दावे फेटाळले आहेत. त्यामुळे पिक विमा कंपन्या प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना मदत करतात हे यावरून स्पष्ट होते.

छत्रपती संभाजीनगरात अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तसे मेसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत. शेतीमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती, आणि त्यातही सरकार आणि विमा कंपन्यांनी ही अशी थट्टा लावली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पिकविम्याचे 70 रूपये आलेत. पण त्यासाठी बँकेत बॅलन्स एक हजार रूपये ठेवावे लागत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

शेतकऱ्यांची सरकार, विमा कंपन्यांकडून थट्टा; गाजावाजा करत 1 रुपयांत पिक विमा, पण खात्यात भरपाई केवळ 70 रुपये

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nida Khan: किराणापासून चिकनपर्यंत...सगळं घरपोच मिळायचं, 43 दिवस अंडरग्राउंड असताना निदा खानची सगळी सोय कोण करायचं?
किराणापासून चिकनपर्यंत...सगळं घरपोच मिळायचं, 43 दिवस अंडरग्राउंड असताना निदा खानची सगळी सोय कोण करायचं?
Sanjay Shirsat on Nashik TCS Case Nida Khan: निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक, संजय शिरसाटांचा थेट आरोप; म्हणाले, 'मी मुख्यमंत्र्यांना...'
निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक, संजय शिरसाटांचा थेट आरोप; म्हणाले, 'मी मुख्यमंत्र्यांना...'
AIMIM Matin Patel: निदा खानला लपवणं अंगलट; फ्लॅट, घर, ऑफीसला अतिक्रमणाचा नोटीस, मतीन पटेलांचं आता नगरसेवकपदही जाणार? महापौरांनी दिली मोठी माहिती
निदा खानला लपवणं अंगलट; फ्लॅट, घर, ऑफीसला अतिक्रमणाचा नोटीस, मतीन पटेलांचं आता नगरसेवकपदही जाणार? महापौरांनी दिली मोठी माहिती
Chhatrapati Sambhajinagar News: विहिरीत उतरून मोटरचं काम करायला गेले अन्...; संभाजीनगरमध्ये वडीलांसह दोन मुलं गाडली गेली, घटनेनं गाव हादरलं!
विहिरीत उतरून मोटरचं काम करायला गेले अन्...; संभाजीनगरमध्ये वडीलांसह दोन मुलं गाडली गेली, घटनेनं गाव हादरलं!

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Nandurbar Fire News: नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसीत अग्नितांडव! टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग, तब्बल 15 किमी अंतरावरून दिसतायेत धुराचे लोट
Embed widget