राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक (Important meeting of the state cabinet) होणार आहे. या बैठकीत सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Maharashtra cabinet Meeting : आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक (Important meeting of the state cabinet) होणार आहे. या बैठकीत सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. काजू उत्पादक शेतकरी, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ यासारखे निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज दुपारी 2 वाजता ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
आजच्या कॅबिनेटमध्ये अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांच्या अंमलबजावणीसाठी 19 महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मुलींची 100 टक्के शुल्काची प्रतिपुर्ती होणार आहे. गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय होणार आहे. त्याचबरोबर शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. तसेच काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय याचबरोबर नविन पर्यटन धोरणासह इतर अनेक विषय कॅबिनेट बैठकीत येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Maha Vikas Aghadi : लोकसभेनंतर विधानसभेला मोर्चेबांधणी; महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक, स्वबळाच्या नाऱ्यावर स्पष्टता येणार?