Crime: आधी पत्नीला संपवलं, त्यांनतर तिनेच जीव दिल्याचा व्हाट्सअपला स्टेट्स ठेवला; पण पोलिसांच्या...
Aurangabad News: मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime News: पैठण तालुक्यातील बिडकीन गावातील सावतानगरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीची हत्या करून फरार झाला आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांची पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर सर्व प्रकार समोर आला आहे. राधा अशोक भगुरे (वय 38, रा. सावतानगर बिडकीन, औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. तर मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बिडकीन पोलिसात अशोक भगुरे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेवराई बार्शी येथे राहणारा मृत महिलेचा भाऊ सोमवारी बहिणाला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. मात्र घराला कुलूप लावलेला होता. तर घरातून दुर्गंधी येत असल्याने त्याने आजूबाजूला असणाऱ्या शेजाऱ्यांना विचारपूस केली. मात्र त्यांना याबाबत काहीच माहित नव्हते. त्यामुळे संशय आल्याने त्याने याची माहिती बिडकीन पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा उघडून पाहिला असता राधा यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यांनतर मृतदेह उत्तर तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.
मोबाईलवर ठेवला स्टेट्स...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक भगुरे याने आधी पत्नीची हत्या केली. त्यांनतर आपल्या व्हाट्सअपला, 'माझ्या पत्नीने आत्महत्या केली असून, मी सुद्धा आत्महत्या करत आहे. त्यामुळे माझ्या दोन मुलांची काळजी घ्या,' असा स्टेट्स ठेवला होता. त्यांनतर तो फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल आणि सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे.
खुनाचा गुन्हा दाखल...
याप्रकरणी बिडकीन पोलिसात राधा यांचे वडील सुरजीलाल मगन शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक हा नेहमी आपली पत्नी राधा यांना पैशांसाठी मारहाण करायचा. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन जीवे मारण्याची धमकी देत असल्याच सुरजीलाल यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.
संबंधित बातम्या
Crime:'माझ्यासोबत बोल अन्यथा आत्महत्या करीन'; एकतर्फी प्रेम करणाऱ्या मजनूवर गुन्हा दाखल
Aurangabad: ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; वाहन अडवून लुटणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या