![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Crime:'माझ्यासोबत बोल अन्यथा आत्महत्या करीन'; एकतर्फी प्रेम करणाऱ्या मजनूवर गुन्हा दाखल
Crime News: घाबरलेल्या तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यामुळे या प्रकरणी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Crime:'माझ्यासोबत बोल अन्यथा आत्महत्या करीन'; एकतर्फी प्रेम करणाऱ्या मजनूवर गुन्हा दाखल maharashtra News Aurangabad Crime News Threats to commit suicide out of one sided love Crime:'माझ्यासोबत बोल अन्यथा आत्महत्या करीन'; एकतर्फी प्रेम करणाऱ्या मजनूवर गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/29/c94fb5cd0a081b12de785aa13c056580_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad Crime News: काही दिवसांपूर्वी घडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एका तरुणीला एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून सतत त्रास दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढच नाही तर माझ्यासोबत बोल आणि प्रेम कर अन्यथा आत्महत्या करेल अशी धमकी सुद्धा या मजनूने दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने पोलिसात धाव घेत या एकतर्फी प्रेम करणाऱ्या मजनूविरोधात तक्रार दिली.त्यामुळे या प्रकरणी सिडको पोलिसांनी प्रेमवीरावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चैतन्य राजेंद्र बाबू ढोके ( वय 34रा. इन्कम टॅक्स हेडक्वार्टर औरंगाबाद) असे या मजनूचे नाव आहे. गेल्या 25 डिसेंबर 2019 पासून चैतन्य एन-8 परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा पाठलाग करीत होता. तिला सतत बोलण्याचा प्रयत्न करायचा. तसेच तिने बोलण्यास नकार दिल्यास अनेकदा रस्त्यात अडवून माझ्याशी बोल असा तगादा लावयचा. पण तरुणीने जुमानले नाही. त्यांनतर त्याने तरुणीचा मोबाईल क्रमांक मिळवून फोन करीत प्रपोज केले. वारंवार मेसेज करून त्रास दिला. मात्र त्यांनतर सुद्धा तरुणीने नकार दिला.
अन्यथा आत्महत्या करतो...
चैतन्य हा एकतर्फी प्रेमातून तरुणीला सतत त्रास द्यायचा. तिला रस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण या सर्वाकडे तरुणीने नेहमी दुर्लक्ष केलं. दरम्यान तरुणी रस्त्याने जात असताना चैतन्य याने तिच्या हाताला धरून विनयभंग केला. तू माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला. तू बोलली नाहीस तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने अखेर सिडको पोलिस ठाणे गाठत प्रेमविराविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात एकतर्फी प्रेम करणाऱ्या चैतन्य ढोके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
Crime News : तोतया 'सीबीआय' अधिकाऱ्याच्या छाप्याचा मास्टर माइंड निघाला भाजपचा माजी पदाधिकारी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)