Amit Shah: छत्तीसगड मध्ये 31 नक्षलवाद्यांना कंठस्थान, चकमकीत 2 जवान शहीद, 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्याचे अमित शाहांचे वचन
31 मार्च 2026 पूर्वी आपण या देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करू, जेणेकरून देशातील एकाही नागरिकाला यामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असा माझा संकल्प असल्याचा निर्धार अमित शाह यांनी केला आहे.

Amit Shah on Chhattisgarh Naxal Encounter : गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात झालेल्या चकमकीत (Naxal Encounter) आतापर्यंत 31 नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र या कारवाईत दोन जवान हुतात्मा झाले असून दोन जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, कारवाईची तीव्रता पाहता ठार नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिणामी या परिसरात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे संयुक्त अभियान सुरु आहे.
दरम्यान, या नक्षल विरोधी कारवाईवर राज्यसह देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 31 मार्च 2026 पूर्वी आपण या देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करू, जेणेकरून देशातील एकाही नागरिकाला यामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असा माझा संकल्प असल्याचा निर्धार अमित शाह (Amit Shah) यांनी केला आहे. एक्सवर पोस्ट करून त्यांनी या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना ही अमित शाह यांनी व्यक्त केल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले अमित शाह?
नक्षलमुक्त भारत करण्याच्या दिशेने छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत 31 नक्षलवाद्यांना ठार मारण्यासोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. आज आपण मानवता विरोधी नक्षलवाद संपवताना आपले दोन शूर सैनिक गमावले आहेत. हा देश या वीरांचा सदैव ऋणी राहील. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. दरम्यान, 31 मार्च 2026 पूर्वी आपण या देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करू, जेणेकरून देशातील एकाही नागरिकाला यामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असा माझा संकल्प असल्याचे अमित शाहांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
मोदी सरकार आल्यापासून देशाला नक्षलवादापासून मुक्ती- केंद्रीय मंत्री पियूष गोयल
केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे आज (9 फेब्रूवारी) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोंदिया येथील कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशातून 2026 पर्यंत नक्षलवाद संपविण्याच्या संकल्प केला आहे. देशातील कुठल्याही कोपऱ्यामध्ये 2026 पर्यंत नक्षलवादाची ताकद उभे राहू शकणार नाही. हे भारताचे सामर्थ्य आहे, हा देशाचा संकल्प आहे. असं म्हणत केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी दिली. तर देशात मोदी सरकार आल्यापासून नागरिकांना नक्षलवादापासून मुक्ती मिळत आहे, असेही ते म्हणाले.
नक्सल मुक्त भारत बनाने की दिशा में सुरक्षा बलों ने छत्तीसगढ़ के बीजापुर में बड़ी सफलता हासिल की है। इस ऑपरेशन में 31 नक्सलियों को ढेर करने के साथ ही भारी मात्रा में हथियार और विस्फोटक सामग्री भी बरामद की गयी है।
— Amit Shah (@AmitShah) February 9, 2025
मानवता विरोधी नक्सलवाद को समाप्त करने में आज हमने अपने दो बहादुर…
2024 मध्ये ठार झालेले नक्षल
16 एप्रिल 2024 - 33
27 मार्च 2024 - 6
2 एप्रिल 2024 - 13
6 एप्रिल 2024 - 3
16 एप्रिल 2024 - 29
30 एप्रिल 2024 - 10
10 मे 2024 - 12
23 आणि 24 मे 2024 - 8
25 मे 2024 - 3
8 जून 2024 - 6
15 जून 2024- 8
3 सप्टेंबर 2024- 9
5 सप्टेंबर 2024 - 6
4 ऑक्टोबर 2024 -32
13 ऑक्टोबर 2024 - 35
22 नोव्हेंबर 2024 - 10
2025 मध्ये छतीसगडमध्ये ठार झालेले नक्षली
5 जानेवारी 2025 - 5 नक्षल ठार
16 जानेवारी 2025 - 18
21 जानेवारी 2025 - 14
2 फेब्रुवारी 2025 - 8
9 फेब्रुवारी 2025 - 31
हे ही वाचा























