(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही; शरद पवारांनी थेट फटकारलं
Maharashtra Politics: भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असं म्हणत शरद पवारांनी थेट फटकारलं आहे.
Sharad Pawar on Chhagan Bhujbal: अकोला : मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असं म्हणत थोरल्या पवारांनी थेट भुजबळांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलं आहे. तसेच, भाजपसोबत जाण्याचा काहींचा आग्रह होता, ही गोष्ट खरी आहे. सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) अध्यक्ष करावं हा भुजबळांचाच प्रस्ताव होता. आमचा तो प्रस्ताव नव्हताच. पण तो स्वीकारला नाही. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची पुढची जी स्टेप होती ती मान्य नव्हती, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, शरद पवारांनी भुजबळांवरच पलटवारही केला आहे. भुजबळ यांनीच आपण खोटं बोलून शपथविधीला गेल्याचं कबुल केल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीतील मतभेदावरुन निशाणा साधला होता. शरद पवार अदानी सोबत असतात आणि राहुल गांधी अदानीला विरोध करतात, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधला होता. गुजरातमध्ये एका शेतकऱ्यानं डेअरी टाकली. दूधापासून नवीन औषध करण्याचा हा कारखाना होता. त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. त्या कार्यक्रमाला अदानींनाही बोलावलं होतं. एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र जमले तर ती राजकीय भूमिका असत नाही, असं शरद पवार म्हणाले.
पक्षात फूट आम्ही पाडली नाही : शरद पवार
आमची भूमिका स्वच्छ. पक्षात फूट आम्ही पाडली नाही. आम्हाला खात्री आहे की आम्हाला आमचा पक्ष म्हणून आमचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल.उद्या कुणी युनायटेड नेशन्सचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहील. आमची भूमिका स्पष्ट आहे पक्षात फूट आम्ही पाडली नाही, असं शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले छगन भुजबळ?
2019 साली शरद पवारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचं ठरवलं होतं, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यावेळी सर्व चर्चा झाली होती, पण ऐनवेळी शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे.
शरद पवार काय काय म्हणाले?
जनमानसात आम्हाला मिळणारा प्रतिसाद मतांत परिवर्तित झाला तर आमची सत्ता येईल. सुप्रिया सुळेंना पक्षाध्यक्ष करा हा छगन भुजबळांचा प्रस्ताव होता. मी उद्योगपती गौतम अदाणी यांच्या औषधाच्या कारखान्याच्या उद्घटनाला गेलो. सार्वजनिक कार्यक्रमात जावं लागतं. अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न. देशात अनेक भागात भाजप नाहीय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढणं ही सरकारची जबाबदारी आहे,आमची नव्हे. भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देण्याची गरज नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sharad Pawar on Ajit Pawar: अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच, शरद पवारांचा बोचरा वार