एक्स्प्लोर
Train Accident : नागपूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे कपलिंग तुटलं; गाडीचे डब्बे निसटले, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Train Accident: नागपूरकडून मुंबईकडे जाणारे रेल्वे महामार्गावर मालगाडीचे कपलिंग अचानकपणे तुटल्याची घटना घडलीय. दरम्यान, या दुर्घटनेचा मुंबईकडं जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झालाय.
Railway Train Accident
1/6

नागपूरकडून मुंबईकडे जाणारे रेल्वे महामार्गावर मालगाडीचे कपलिंग अचानकपणे तुटल्याची घटना घडलीय. ज्यामध्ये रेल्वेचे दोन भाग झाले असून गार्डसह काही डबे मागे राहिलेत, तर इंजिनसह उर्वरित डबे काही अंतरावर पुढे निघून गेल्याची घटना घडलीय.
2/6

दरम्यान, या दुर्घटनेचा मुंबईकडं जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झालाय. मात्र, वेळीच सुधारणा करण्याचं काम सुरु असून लवकर रेल्वे वाहतूक पूर्ववत होणार आहे.
3/6

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडलीय. नागपूरकडून अकोलाकडे जाणाऱ्या धावत्या मालवाहू रेल्वे गाडीचे डब्बे निसटले.
4/6

मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने ही घटना घडली होती. मात्र, वेळीच हा प्रसंग लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय.
5/6

बोरगाव मंजू रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर पोल क्रमांक 599/12 ते 599/12 नजीक धावत्या मालगाडीचे डब्बे निसटले होते. दरम्यान रेल्वे पायलटने प्रसंगावध राखत धावत्या रेल्वेचा वेग नियंत्रित केला.
6/6

दरम्यान नागपूरवरुन भुसावळ, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर काही काळासाठी परिणाम झाला आहे.
Published at : 17 Aug 2025 02:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























