'नेत्याला जवळ करुन ताकद कमी करायची ही भाजपची प्रवृत्ती', काकांच्या नाराजींच्या चर्चांवर रोहित पवारांचं भाष्य
गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, फुंडकर, गडकरी, खडसे या सर्वांची ताकद भाजपने कमी केली आहे. त्यामुळे जे आयात केले आहेत त्यांच्याबाबतीत तेच होईल, असं रोहित पवारांनी म्हटलंय.
अहमदनगर : अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या लोकनेत्याला जवळ करायचं, त्याची ताकद कमी करायची, अशी भाजपची (BJP) प्रवृत्तीच आहे, असा घणाघात रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, फुंडकर, गडकरी, खडसे या सर्वांची ताकद भाजपने कमी केली आहे. त्यामुळे जे आयात केले आहेत त्यांच्याबाबतीत तेच होईल, असं रोहित पवारांनी म्हटलंय.
शिंदे फडणीस सरकारमध्ये अजित पवार शामील झाल्यानंतर ते नाराज असल्याचे बोललं जातय. यावरून आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. भाजपची प्रवृत्ती आहे एखाद्या लोकनेतेला जवळ करायचं आणि त्याची ताकद कमी करायची असा टोला रोहित पवारांनी लगावलाय.तसेच भाजपामधील जे लोकनेते असतील पूर्वी गोपीनाथ मुंडे होते आता पंकजा मुंडे असतील तसेच गडकरी, खडसे या सर्वांचे ताकद भाजपने कमी केली. त्यामुळे जे आता आयात केले आहेत त्यांच्या बाबतीत तेच होईल अस रोहित पवारांनी म्हटलंय. दिल्लीला तर दोघेच गेले अजित पवार गेले नाही त्यामुळे भाजपची प्रवृत्ती सर्वांना माहिती असल्याच रोहित पवारांनी म्हटलंय.
सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला दहा पालकमंत्री मिळाल्याची चर्चा सुरू आहे. यावरून रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे. एका मंत्र्याकडे पाच पाच जिल्हे आहे मात्र अशी परिस्थिती आहे की तिथल्या लोकांना न्याय मिळत नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय. तसेच अनेक निधी लोकांपर्यंत पोहोचत नाही जे नांदेडला झालं तसंच तो प्रकार असून राज्यातील गोंधळ फक्त पदासाठी झाला आहे. पदाच्या अवतीभवती सरकार गुंतले आहे. याचा फटका सामान्य लोकांना बसत असल्याचे मत रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
मुंडे कुटुंबाला भाजपने वाऱ्यावर सोडले
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी बघायची नोटीस आल्यानंतर त्या आर्थिक संकटात असले तर त्यांनी म्हटलं होतं. यावर आता त्यांच्या समर्थक त्यांच्या मदतीसाठी उतरले असताना आमदार रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे या लोकांमधल्या नेत्या आहे जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले त्यांना दीडशे दीडशे कोटी रुपये निधी दिला. मात्र ज्या लोकांनी भाजप मोठी व्हवी त्यासाठी परिश्रम घेतले त्या मुंडे कुटुंबाला तुम्ही सहज वाऱ्यावर सोडून देतात मदत करत नाही असा टोला रोहित पवार यांनी लावलाय. तसेच जे साखर कारखाने कुठल्याही निकषात बसत नाही त्यांना तुम्ही शंभर कोटी मदत करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. इतर नेत्यांना जशी मदत केली तशी त्यांना केली असती तर काय झालं असतं, मदत झाली नाही याच्यापेक्षा मदत केली नाही आणि ती कोणी केली नाही हे लोकांना माहिती आहे अशी जोरदार टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
हे ही वाचा:
एका दादांचं डिमोशन, दुसऱ्या दादांचं प्रमोशन, पुण्यात चंद्रकांतदादांऐवजी अजितदादा पालकमंत्री, संपूर्ण 12 जिल्ह्यांची यादी