एक्स्प्लोर

विधानसभेची खडाजंगी: अहमदनगरमध्ये 12 विधानसभा मतदारसंघ, आमदारांची यादी, जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती

Maharashtra Politics: महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक होणार आहे. अहमदनगर जिल्हा विधानसभा निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नगरमध्ये एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून सर्वठिकाणी हायव्होल्टेज लढाई पाहायला मिळू शकते.

Ahmednagar District: सहकारातून ग्रामोन्नती आणि संतांची भूमी म्हणून अहमदनगर जिल्ह्याची ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्याला सात जिल्ह्यांच्या सीमांनी जोडले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा जिल्हा म्हणूनही अहमदनगर जिल्ह्याला ओळखले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असेलेला अहमदनगर जिल्हा (Ahmednagar Vidhansabha constituencies) सहकारी चळवळीसाठी ओळखला जातो. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे बडे राजकारणी या जिल्ह्यात नेहमीच घडले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थक्षेत्र शिर्डी, मेहेरबाबांची समाधी, घरांना दारे नसलेले शनिशिंगणापूर, अहिल्यादेवींचे जन्मस्थान चौंडी ही धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे या जिल्ह्यात आहेत. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीत जिल्ह्यातील अनेकांचे मोठे योगदान राहिले. जिल्ह्याचे मुख्यालय अहमदनगर हे शहर अहमद निजाम शाह याने इ.स. १४९६ मध्ये वसविलेले. निजामशाहीच्या राजधानीचे शहर पुढे त्याच्याच नावाने ओळखले जाऊ लागले. त्याची समाधीही या शहरात आहे

राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना विठ्ठलराव विखे यांनी नगर जिल्ह्यातील प्रवरा या ठिकाणी स्थापन केला. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने नगर जिल्ह्यातच आहेत. त्याचमुळे सहकाराची पंढरी म्हणून जिल्ह्याला संपूर्ण देशात ओळखले जाते. लोकसभेचे दोन आणि विधानसभेचे बारा मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत. त्यापैकी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे २ आमदार (लोकसभा निवडणुकीत निलेश लंके अहमदनगर दक्षिणमधून खासदार) , अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे 3 आमदार, भाजपचे 3 आणि काँग्रेसचे 2 आमदार तसेच शंकरराव गडाख यांच्या रुपाने 1 अपक्ष आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातील आमदार

संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
अकोले- डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी)
कोपरगाव- आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
श्रीरामपूर- लहू कानडे (काँग्रेस)
नेवासा- शंकरराव गडाख (अपक्ष)
शेवगाव पाथर्डी- मोनिका राजळे (भाजप)
राहुरी- प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
पारनेर- निलेश लंके (राष्ट्रवादी)
अहमदनगर शहर- संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
कर्जत जामखेड- रोहित पवार (राष्ट्रवादी)

2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य


1. संगमनेर- 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 25 हजार 380 हजार मते मिळाली होती. तर साहेबराव नवले यांना 63128 मते मिळाली होती. आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक ६४ टक्के मते थोरात यांना मिळाली होती. उत्तरोत्तर मताधिक्यामुळे थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला होता.

2. शिर्डी- शिर्डी विधानसभा मतदारसंघात 2019 सालच्या निवडणुकीत भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी  काँग्रेसच्या सुरेश थोरात यांचा पराभव केला होता. शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला होता. राधाकृष्ण विखे यांना 96 हजार 995 मते मिळाली तर सुरेश थोरात यांना २८ हजार मते मिळाली. 1 लाख 69 हजार एवढे मतदान झाले आहे. विखे 69 हजारांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले होते.

3. अकोले- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या किरण लहामटे यांनी भाजपच्या वैभव मधुकरराव पिचड यांचा पराभव केला होता. डॉ. किरण लहामटे यांना 1 लाख 13 हजार 414 मतं मिळाली होती. तर वैभव पिचड यांना 55,725 मतं मिळाली होती.

4.  कोपरगाव- गेल्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशुतोष काळे यांनी भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचा निसटता पराभव केला होता. आशुतोष काळे यांना 87 हजार 566 मते पडली होती. तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांना 86 हजार 744 मते मिळाली होती.

5. श्रीरामपूर- या मतदारसंघात 2019 साली काँग्रेसच्या लहू कानडे यांनी शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लहू कानडे यांना 93,906 मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळे यांना 74,912 मते पडली होती.

6. नेवासा- गेल्या विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत शंकरराव गडाख यांना 1 लाख 16 हजार 943 मतं पडली होती. तर बाळासाहेब मुरकुटे यांना 86 हजार 280 मतं पडली होती. 

7. शेवगाव पाथर्डी- 2019 झालेल्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतापराव ढाकणे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत मोनिका राजळे यांना एकूण 1 लाख 12 हजार 509 मते पडली होती. तर प्रतापराव ढाकणे यांना 98 हजार 215 मते मिळाली होती.

8. राहुरी- गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या शिवाजी कार्डिले यांना पराभवाची धूळ चारली होती. ही निवडणूक अटीतटीची झाली होती. या निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांना 1 लाख 9 हजार 234 मते मिळाली होती. तर भाजपच्या शिवाजी कार्डिले यांना 85 हजार 908 मते मिळाली होती.

9. पारनेर- पारनेर विधानसभा मतदारसंघात 2019 साली लोकसभेचे सध्याचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके विजयी झाले होते. त्यांनी पारनेरमधून तीन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या विजयराव औटी यांचा पराभव करण्याची किमया साधली होती. या निवडणुकीत निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यांना 1 लाख 39 हजार 963 मते मिळाली होती. तर विजयकुमार औटी यांना 80 हजार 125 मते पडली होती.

10. अहमदनगर शहर- गेल्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर शहर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल भैय्या राठोड यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत संग्राम जगताप यांनी 81 हजार 217 मते मिळवली होती. तर शिवसेनेच्या अनिल राठोड यांना 70 हजार 078 मते मिळाली होती.

11. श्रीगोंदा- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल जगताप यांचा निसटता पराभव केला होता. या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांना 1 लाख 03 हजार 258 मते मिळाली होती. तर राहुल जगताप यांना 99 हजार 281 मते मिळाली होती.

12. कर्जत-जामखेड- गेल्या विधानसभा निवडणुकीत  कर्जत-जामखेड मतदारसंघ शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्या उमेदवारीमुळे चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीत रोहित पवार हे भाजपचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारत जायंट किलर ठरले होते. रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात राम शिंदे यांना अस्मान दाखवले होते. या निवडणुकीत राम शिंदे यांना 92 हजार 477 मते पडली होती. तर रोहित पवार यांनी 1 लाख 35 हजार 824 मते मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला होता.

आणखी वाचा

मुंबईत सध्या कोणत्या पक्षाचे किती आमदार? 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालांनुसार, सर्व आमदारांची यादी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तरZero Hour : महायुतीच्या आधीच अजित दादांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामाZero Hour:डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष ते महायुतीच्या आधी दादांचा जाहीरनामा;झीरो अवरमध्ये चर्चाABP Majha Headlines | 10 PM TOP Headlines | 10 PM 06 November 2024 | एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget