एक्स्प्लोर
Guru Purnima 2024 : साईनगरी भक्तांनी गजबजली! आजपासून तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, भक्तांसाठी साईमंदिर रात्रभर राहणार खुलं
Guru Purnima 2024 : शिर्डीत साईबाबा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. या निमित्ताने देश विदेशातील लाखो भाविक शिर्डीत उपस्थित झाले आहेत.

Guru Purnima 2024
1/7

दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली आहे. या निमित्ताने आजपासून तीन दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज गुरुपौर्णिमा निमित्त शिर्डीत साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे.
2/7

साईबाबा संस्थानच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास आज पहाटे प्रारंभ झाला असून पहाटे काकड आरती मंगलस्थानानंतर साई चरित्राची ग्रंथ मिरवणूक काढून या उत्सवाला सुरुवात झाली.
3/7

साई भक्तांच्या सेवेसाठी साई संस्थान सज्ज झालं असून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
4/7

आज उत्सवाचा पहिला दिवस असून साईसच्चरित ग्रंथाच्या मिरवणुकीत संस्थांनचे अध्यक्ष सुधाकर येरलगड्डा, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि आणि संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर सहभागी झाले होते.
5/7

उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असून भक्तांसाठी साईमंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
6/7

गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त राज्यभरातून अनेक पायी पालखी देखील आता शिर्डीत पोहोचायला सुरुवात झाली आहे.
7/7

दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहा साजरा करण्यात येणार आहे.
Published at : 20 Jul 2024 10:53 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
