एक्स्प्लोर
वादग्रस्त IAS लेकीच्या वडिलांनी लंकेंविरुद्ध निवडणूक लढवली; अहमदनगरमधून किती मतं पडली?
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे.
![वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/d3d770e6fbe978dd2fd036d0ea2bb0b517206041270151002_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Dilip Khedkar contest loksabha election against nilesh lanke
1/9
![वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/286bf7839d7f7aa7919dabac3b3eb64af5121.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे.
2/9
![दिलीप खेडकर यांचं मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील भालगाव असल्याने त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/30408602bf5e9318981e1ac1d78b865a61b6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिलीप खेडकर यांचं मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील भालगाव असल्याने त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. विशेष म्हणजे त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.
3/9
![अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत निलेश लंके 28 हजार मतांनी विजयी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/26d097ba90d42435f867f828040c4e8e77ad7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत निलेश लंके 28 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
4/9
![याच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या वाद्रगस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत त्यांना केवळ 13,749 मतं मिळाली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/b1de0fb9324b9098a9cfdff5dc90baab61b18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या वाद्रगस्त ठरलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत त्यांना केवळ 13,749 मतं मिळाली आहेत.
5/9
![या मतदारसंघातील उमेदवारांमध्ये ते चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत, तर अपक्ष उमेदवार गोरख दशरथ आलेकर हे 44,597 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/3ea563ea44fea857f6aafd01ae7bec5ac0989.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मतदारसंघातील उमेदवारांमध्ये ते चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत, तर अपक्ष उमेदवार गोरख दशरथ आलेकर हे 44,597 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.
6/9
![दिलीप खेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांची एकूण संपत्ती 40.50 कोटी एवढी असून पुणे, अहमदनगर आणि नवी मुंबईतही त्यांचे फ्लॅट आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/996608fa4ced7dcbe5bf1a49208641b04fb18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिलीप खेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांची एकूण संपत्ती 40.50 कोटी एवढी असून पुणे, अहमदनगर आणि नवी मुंबईतही त्यांचे फ्लॅट आहेत.
7/9
![दिलीप खेडकर यांच्या पत्नी म्हणजेच डॉ.मनोरमा खेडकर याही गावच्या सरपंच आहेत, खेडकर दाम्पत्यास दोन अपत्य आहेत, त्यापैकी मुलगा पियुष खेडकर सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि पूजा खेडकर...पियुष खेडकर हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/2ca8158d4fa4f4ca7f6848eb987b40ff02455.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिलीप खेडकर यांच्या पत्नी म्हणजेच डॉ.मनोरमा खेडकर याही गावच्या सरपंच आहेत, खेडकर दाम्पत्यास दोन अपत्य आहेत, त्यापैकी मुलगा पियुष खेडकर सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि पूजा खेडकर...पियुष खेडकर हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
8/9
![दिलीप खेडकर यांच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर जमीन असून ते जवळपास 60 एकर वनविभागाची जमीन कसत आहेत. मात्र, वनविभागाची जमीनदेखील गैरपद्धतीनेच ते कसत असल्याच्या चर्चा आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/4f9cbd3b6a90901380b7c2cabd290bf79b382.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिलीप खेडकर यांच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर जमीन असून ते जवळपास 60 एकर वनविभागाची जमीन कसत आहेत. मात्र, वनविभागाची जमीनदेखील गैरपद्धतीनेच ते कसत असल्याच्या चर्चा आहेत
9/9
![. बी ई (मेकॅनिकल) शिक्षण झालेले दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते. दरम्यान दिलीप खेडकर,सेवा निवृत्त होताच त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/10/a66cccee9e45c45321fbdaec74f62e585d94b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. बी ई (मेकॅनिकल) शिक्षण झालेले दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते. दरम्यान दिलीप खेडकर,सेवा निवृत्त होताच त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली
Published at : 10 Jul 2024 03:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)