Chup Review : अंगावर शहारे आणणारा 'चुप'
Chup Movie Review : 'चुप' सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळत आहे.
R Balki
दुलकर सलमान, पूजा भट्ट, श्रेया धनवंतरी, सनी देओल
Chup Review : 'चुप' (Chup) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), दुलकर सलमान (Dulquer Salmaan), पूजा भट्ट (Pooja Bhatt) आणि श्रेया धनवंतरी (Shreya Dhanwanthary) मुख्य भूमिकेत आहेत.
'चुप' सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळत आहे. या सिनेमात दुलकर सलमान सर्वांवर भारी पडला आहे. दुलकरचे अनेक शेड्स या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. दुलकर सलमानची सिनेमातली जागा कोणताच अभिनेता घेऊ शकला नसता याची जाणीव सिनेमा पाहताना होते. सनी देओलच्या कामाचंही कौतुक. सनीचा सटल अभिनय प्रेक्षकांना जास्त भावतो.
श्रेया धनवंतरीनेदेखील तिची भूमिका चोख पार पाडली आहे. पत्रकाराच्या भूमिकेला योग्य न्याय देताना ती दिसून येत आहे. पूजा भट्टला रुपेरी पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना आवडत आहे. त्यामुळेच 'चुप' या सिनेमातील प्रत्येक कलाकाराने त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सिनेमात दाखवण्यात आलेल्या काही गोष्टी प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत.
आर बल्की, राजा सेन आणि ऋषी विरमानी तिघांनी मिळून या सिनेमाच्या लेखनावर घेतलेली मेहनत सिनेमा पाहताना जाणवतं. हा सिनेमा अनेक गोष्टीचं रहस्य उलगडणारा आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेली प्रेमकथा वेगळी आहे. 'ये है मुंबई मेरी जान' हे सिनेमातील गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
बनावट, खोट्या जगावर भाष्ट करणारा 'चुप' हा सिनेमा आहे. या सिनेमात अनेक क्लायमॅक्स आहेत. उत्तम सिनेमॅट्रोग्राफीमुळे सिनेमात प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवतो. सध्या हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला असला तरी लवकरच 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सध्या यावर बोलणी सुरू आहेत.
'चुप' सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य पाहायला मिळत आहे. अनेक लोकप्रिय सिनेमांचा दिग्दर्शक आर. बल्कीने (R Balki) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सनी देओलचा अॅंग्री यंग मॅन अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात अमिताभ बच्चनदेखील भाग आहेत. या सिनेमाच्या ‘संगीत संयोजक’ची धुरा अमिताभ यांनी सांभाळली आहे.
संबंधित बातम्या