Chup Teaser : सनी देओलचा 'चुप' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अमिताभ बच्चनने शेअर केला टीझर
Chup : 'चुप' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमात सनी देओलसोबत दुलकर सलमानदेखील दिसून येणार आहे.
Chup Teaser : सनी देओलच्या (Sunny Deol) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सनी देओल 'चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट' (Chup Revenge Of The Artist) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आर बाल्किने (R Balki) सांभाळली आहे.
'चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाचा टीझर अभिनेते गुरु दत्त यांना समर्पित करण्यात आला आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता दुलकर सलमानदेखील दिसून येणार आहे. तसेच पूजा भट्ट आणि श्रेया धनवंतरीदेखील या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. 'चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाचा टीझर अमिताभ बच्चननेदेखील शेअर केला आहे.
View this post on Instagram
थरार नाट्य असलेला 'चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट'
'चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. आर बाल्किने या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या