Chup : अंगावर शहारे आणणारा 'चुप' सिनेमाचा ट्रेलर आऊट; सनी देओल मुख्य भूमिकेत
Chup : 'चुप : रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात सनी देओल मुख्य भूमिकेत असणार आहे.
Chup Movie Trailer : 'चुप : रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' (Chup Revenge Of The Artist) या सिनेमाच्या माध्यमातून सनी देओल बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य पाहायला मिळणार आहे. आर. बल्कीने (R Balki) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
'चुप'च्या ट्रेलरमध्ये सनी देओल अॅंग्री यंग मॅन अंदाजात दिसून येत आहे. या सिनेमात सनी देओलसह दुलकर सलमान, पूजा भट्ट आणि श्रेया धनवंतरीदेखील दिसून येणार आहेत. 1 मिनिट 58 सेकंदचा 'चुप'चा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा आहे. अक्षय कुमारनेदेखील इंस्टाग्रामवर 'चुप : रिवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाचा ट्रेलर शेअर करत आर. बल्कीला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन हे नाव आता झळकणार ‘संगीत संयोजक’ म्हणून
'चुप' या सिनेमाचं कथानक आर.बल्कीने लिहिलं आहे. 'चुप' या सिनेमात अमिताभ बच्चन यांचा सहभाग असणार आहे.
पण अभिनेता म्हणून नव्हे तर यावेळी बच्चन यांचं नाव पडद्यावर ‘संगीत संयोजक’ म्हणून झळकणार आहे. 23 सप्टेंबरला 'चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
थरार नाट्य असलेला 'चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट'
'चुप : रीवेंज ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमात प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. आर बाल्किने या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. येत्या वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून आता प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या
Chup Teaser : सनी देओलचा 'चुप' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अमिताभ बच्चनने शेअर केला टीझर
Babli Bouncer Trailer : 'बबली बाउंसर'चा ट्रेलर रिलीज; तमन्ना भाटियाची दमदार भूमिका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
