LIVE BLOG : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून
LIVE
Background
1. नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या चरणी, विरोधकांचा शेलक्या शब्दात समाचार, तर रामासाठी कार्य केलं पाहिजे, सरसंघचालकांकडून राम मंदिराची आठवण
2. आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार का? युवासेना सरचिटणीसांच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण, तर केंद्र आणि राज्यातल्या मंत्रिपदासाठी मातोश्रीवर बैठक
3. उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्यानंतर गुन्हा दाखल
4. आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल, दुपारी एक वाजल्यापासून वेबसाईटवर जाहीर होणार निकाल, सर्व विद्यार्थ्यांना एबीपी माझाच्या शुभेच्छा
5.लोकसभा निकालानंतर इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्याचं मोदी सरकारसमोर आव्हान, पेट्रोलचे दर 3 रुपयांनी वाढणार, तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता
6) मराठमोळ्या राही सरनोबतची विश्वचषक नेमबाजीत सोनेरी कामगिरी, राहीला 25 मीटर्स पिस्टर प्रकारात सुवर्ण, टोकीयो ऑलिम्पिकचं तिकीटंही कन्फर्म