एक्स्प्लोर
LIVE BLOG : Karnataka Crises | कुमारस्वामींकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Background
- आदित्यच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राऊतांचे संकेत, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव ठाकरे- अमित शाह घेतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
- कर्नाटकाच्या राजकीय नाट्याचा आज क्लायमॅक्स होण्याची शक्यता, दुपारी दीडपर्यंत विश्वासदर्शक प्रस्ताव घेण्याचं आवाहन, भाजप आमदारांचं रात्रभर विधानसभेत धरणे आंदोलन
- कृत्रिम पावसाच्या प्रयोगापूर्वीच्या निरीक्षणासाठी सोलापुरात केंद्राची विमानं दाखल, तर राज्य सरकारकडूनही हालचालींना वेग, 30 जुलैपूर्वी प्रयोगाची शक्यता
- नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदा बरखास्त, कार्यकाळ संपल्यानंतरही निणडणुका लांबवल्यानं कारवाई
- टिकटॉक मोबाईल अॅपवर बंदी घालण्यासाठी मोदींना पत्र, देशविरोधी भावना भडकवत असल्याची तक्रार, तर टिकटॉकवर आक्षेपार्ह व्हीडिओ टाकणाऱ्या एजाज खानला अटक
- मुंबईच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक रोबो दाखल, चिंचोळ्या जागेत आग विझवण्यासाठी मदत होणार, देशातील पहिलाच प्रयोग
21:44 PM (IST) • 19 Jul 2019
नीलगाय आणि रानडुकरांच्या शिकारीची परवानगी देणाऱ्या अध्यादेशाला हायकोर्टाची स्थगिती, जनावरांनी शेतीचे नुकसान केल्याच्या तक्रारीवर वन विभागाने 24 तासांत कारवाई न केल्यास शिकारीची परवानगी, वन्यजीव संवर्धनाच्या मुद्याखाली 22 जुलै 2015 च्या सरकारी आदेशाला कोर्टाची स्थगिती
21:07 PM (IST) • 19 Jul 2019
बुलडाणा : रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीला धडक, दुचाकीवरील महिला जागीच ठार, गावकऱ्यांनी टिप्पर पेटवला, खामगाव ते जलंब या मार्गावरील घटना
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























