Fitness Tips: वयाच्या 85 व्या वर्षीही सलमान खानच्या आईचा कमालीचा फिटनेस! तासनतास व्यायाम, डाएट जाणून थक्क व्हाल
Fitness Tips: वयाच्या 85 व्या वर्षीही सलमान खानची आई जिममध्ये जाते, तासनतास व्यायाम करते, या संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
Fitness Tips: ओ हसीना जुल्फों वाली जानेजहाँ... ये मेरा दिल प्यार का दिवाना..., पिया तू अब तो आजा..., तुम्ही ही सदाबहार गाणी नक्कीच ऐकली किंवा पाहिली असतील. या गाण्यांवर आपली जादू पसरवणारी हेलन. जिला वेगळ्या परिचयाची गरज नाही. अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी 1981 मध्ये हेलनशी लग्न केले. म्हणूनच सलमान खानची ही आई फिटनेसच्या बाबतीत कमी नाही.. वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन आपल्या फिटनेसची पूर्ण काळजी घेतात. आजही त्या तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने जिममध्ये तासनतास वर्कआउट करत असतात. (Helen Fitness Secret)
काय आहे हेलनच्या फिटनेसचे रहस्य?
सलमान खानप्रमाणेच त्याची आईही फिटनेसची पूर्ण काळजी घेते. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरने हेलन यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती हेलनसोबत बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताच क्षणी अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. कारण यामध्ये हेलन जिममध्ये पिलेट्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हेलन जिम ट्रेनरच्या देखरेखीखाली पिलेट्स कशा करत आहे हे दिसत आहे. व्हिडीओमध्ये हेलन त्यांच्या या वयातही कसाप्रकारे जबरदस्त वर्कआऊट करतात हे दिसत आहे. व्हिडीओमध्ये यास्मिन हेलनला त्यांच्या फिटनेसबद्दल विचारते. त्याला उत्तर देताना, हेलन म्हणतात की, त्यांना पिलेट्स करायला आवडते. इतकंच नाही तर रोज त्याची वाट पाहत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आजही त्या तासनतास वर्कआउट करतात. हेलन या जिममध्ये अतिशय जोमाने पायलेट्स करतात.
हेलन यांना कशात आनंद वाटतो?
हेलन म्हणतात की त्यांना Pilates क्लासमध्ये आल्यावर आनंद वाटतो. या वयातही त्यांना ऊर्जा, आनंदी आणि जिवंत वाटते. त्या म्हणतात, की दररोज त्याची वाट पाहते. यामुळे मला उत्साह वाटतो. मला मद्यपान करण्याची किंवा धुम्रपान करण्याची गरज नाही, कारण मला Pilates मुळे जास्त एनर्जी मिळते. मला इथे यायला आवडते. वयाच्या 85 व्या वर्षी मी हे करू शकलो, यासाठी मी सर्व प्रशिक्षकांचे आभार मानते. असं त्या म्हणतात.
View this post on Instagram
Pilates काय आहे?
हेलनने सांगितले की आजही त्या कोणाच्याही मदतीशिवाय चालू शकते. याचे श्रेय ती तिच्या नियमित Pilates दिनचर्येला देते. पिलेट्स हा एक व्यायाम आहे, ज्यासाठी संपूर्ण शरीर वापरले जाते. याद्वारे शरीर लवचिक आणि मजबूत बनते. स्नायू मजबूत आणि आरामशीर होतात. शरीराचे संतुलन अबाधित राहते. याशिवाय Pilates केल्याने हाडांचे दुखणे कमी होते. सांधेदुखीपासून आराम मिळतो. पाठीचा कणा मजबूत होतो.
हेही वाचा>>>
Fitness Tips: करिश्मा कपूरनेही एकेकाळी तब्बल 25 किलो वजन कमी केले होते, आता दिसते नवतरुणी काश्मिरी! फिटनेस सीक्रेट जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )